मोठी बातमी! राजकारणात पुन्हा उलथापालथ, खासदार सुनेत्रा पवार शरद पवार यांच्या भेटीला….

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर एक मोठी माहिती समोर आली आहे. काल अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील सिल्वर ओकवर गेले होते. त्यांची बंद दाराआड तास-दीडतास चर्चा झाली.

त्यानंतर आज शरद पवार यांच्या पुण्यातील मोदीबागेत खासदार सुनेत्रा पवार पोहचल्या आहेत. सुमारे तासभरापेक्षा जास्त वेळ खासदार सुनेत्रा पवार मोदी बागेत होत्या. त्यावेळी शरद पवार त्याच ठिकाणी होते. यामुळे यावेळी नेमकी काय चर्चा झाली याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

या भेटीत सुनेत्रा पवार यांनी मोदी बागेत कोणाची भेट घेतली आणि काय चर्चा झाली, ही माहिती मिळू शकली नाही. मात्र, दोन दिवसांपासून राज्यातील राजकारणाची दिशा पुन्हा शरद पवार यांच्याकडे सुरु झाली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे बारामतीतून निवडणुकी मैदानात होत्या. त्यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवणुकीत उतरल्या होत्या. नणंद-भावजय यांच्या या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. यामध्ये सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली.

त्यावेळी संपूर्ण पवार कुटुंबिय अजित पवार यांच्या विरोधात गेले होते. अजित पवार यांचे सख्ख्ये बंधूसुद्धा त्यांच्या विरोधात प्रचारात होते. या निवडणुकीत पवार कुटुंबियांमध्येच आरोप-प्रत्यारोप झाले होते. या निवडणुकीनंतर प्रथमच सुनेत्रा पवार शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी गेल्या आहेत.

त्यावेळी शरद पवार मोदीबागेतच होते. सुमारे तासभर सुनेत्रा पवार त्या ठिकाणी होत्या. परंतु त्यांनी कोणाची भेट घेतली? शरद पवार यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली का? ही माहिती मिळाली नाही. लवकरच याबाबत माहिती समोर येईल.