मोठी बातमी! महिला आमदाराचा कार अपघातात 37 व्या वर्षी मृत्यू, कारचा झाला अक्षरशः भुगा….

अपघातांच्या घटनेत सध्या मोठ्या वाढ होताना दिसत आहे. यामध्ये सर्वसामान्य लोकांपासून ते मोठ्या व्यक्तींचे देखील अपघात होत आहेत. आता सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगणातील सिकंदराबाद कँट मतदारसंघातील बीआरएस आमदार लस्या नंदिता यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) रस्ता अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्या फक्त ३७ वर्षांच्या होत्या. हैदराबादमधील नेहरू आऊटर रिंग रोडवर त्यांची कार नियंत्रणाबाहेर जाऊन दुभाजकाला धडकली. यामध्ये गाडीचा अक्षरशः भुगा झाला आहे.

हा अपघात एवढा भीषण होता की त्यांचा कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्यांच्या कुटूंबाला देखील या अपघातामुळे मोठा धक्का बसला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

आमदार लस्या नंदिता यांच्यासोबत झालेल्या या अपघातात त्यांच्या चालकालाही गंभीर दुखापत झाली आहे. त्याला देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

संगारेड्डीतील अमीनपूर मंडल परिसरातील सुलतानपूर आऊटर रिंग रोडवर कारचे नियंत्रण सुटले, कार दुभाजकाला धडकली आणि हा अपघात झाला. लस्या नंदिता सिकंदराबाद कॅन्टच्या आमदार आहेत. एक तरुण आमदार म्हणून त्यांची ओळख होती.

याच्या काही दिवसांपूर्वीच त्या एका अपघातातून थोडक्यात बचावल्या होत्या. बीआरएस प्रमुख के चंद्रशेखर राव यांनीही नंदिताच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि त्यांच्या शोकग्रस्त कुटुंबाला पक्षाकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

लस्या नंदिता यांनी सुमारे दशकभरापूर्वी राजकारणात प्रवेश केला. २०२३ च्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत सिकंदराबाद कॅन्टोन्मेंटमधून आमदार म्हणून निवडून येण्यापूर्वी त्यांनी कवडीगुडा प्रभागात नगरसेवक म्हणून काम केले. त्यांच्या या अपघातामुळे त्यांच्या मतदार संघातील लोकांना देखील धक्का बसला आहे.