प्रेयसीचा हात चावला, केस ओढले, नंतर अंगावर घातली गाडी, अन्…; बड्या अधिकाऱ्याच्या मुलाचे धक्कादायक कृत्य…

ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी प्रियकरानेच आपल्या प्रेयसीच्या अंगावर गाडी घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

आरोपी अनिल गायकवाड हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचा मुलगा आहे. यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अश्वजित गायकवाड असे त्याचे नाव आहे.

प्रियसी प्रिया सिंगने सोशल मिडियावरून याबाबत माहिती दिली आहे. तो थोडा विचित्र वागत असल्याचे तिच्या लक्षात आले. यानंतर तिने त्याला खासगीत बोलण्यास सांगितले. यावेळी अश्वजितसोबत त्याचा एक मित्र होता जो तिचा अपमान करु लागला होता.

आपण अश्वजितला आपली बाजू घेण्यास सांगितले असता त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रियकराने मला कानाखाली लगावली, गळा दाबण्याचा प्रयत्न केला. मी त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. त्याने माझा हात चावला, मारहाण केली, केस ओढले, असेही म्हटले आहे.

तसेच त्याच्या मित्राने मला खाली जमिनीवर ढकलले, असेही तिने म्हटले आहे. त्याने चालकाला माझ्या अंगावर गाडी घालण्यास सांगितली. माझ्या पायावरुन गाडी घातल्यानंतर ते पळून गेले, असेही तिने इन्स्टाग्रामवर म्हटले आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

या प्रकरणी तपास सुरु असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. याबाबत पोलिसांनी तक्रार दाखल करण्यासाठी टाळाटाळ केल्याची देखील माहिती समोर येत आहे. यामुळे हे प्रकरण तापले आहे.