नुकतीच लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील २० उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. भाजपच्या दुसऱ्या यादीत दादरा नगर हवेली आणि दमण दीवची उमेदवारी कलाबेन डेलकर यांना जाहीर करण्यात आलेली आहे. यामुळे त्यांच्या नावाची सध्या वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
कलाबेन डेलकर या लोकसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून विजयी झाल्या होत्या. कलाबेन डेलकर यांचे पती खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेमे त्यांना उमेदवारी दिली होती.
असे असताना मात्र आता त्यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. कलाबेन डेलकर यांनी नरेद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्या भाजपच्या वाटेवर आहेत, हे स्पष्ट झालं होतं. आता त्यांना उमेदवारी दिल्याने ते भाजपात जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
आता दादरा नगर हवेली दमण आणि दीवमध्ये आता भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होईल. कलाबेन डेलकर यांनी डिसेंबर २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. केंद्रातील भाजप सराकरकडून महिलांसाठीच्या आरक्षणाचं विधेयक मंजूर केल्यानंतर कलाबेन डेलकर यांनी त्याचं स्वागत केलं होतं
दरम्यान, भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी ७२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलेली आहे. पहिल्या यादीत भाजपनं १९५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश नव्हता.
आजच्या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली आहे. यामुळे इतर पक्ष देखील लवकरच उमेदवार जाहीर करतील. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीचे अजुन उमेदवार ठरले नाहीत.