राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी हा मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. अनेक आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी उत्सुक होते. त्यामुळे त्यांचे लक्ष हा मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे लागून होते.
अनेक आमदारांनी मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे कोणाकोणाला मंत्रिपदाची संधी दिली जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. शिंदे गटातील असे काही आमदार आहेत, ज्यांनी जाहीरपणे आपल्याला मंत्रिपद मिळणार असे म्हटले होते. पण त्यांना ते दिले गेले नव्हते. त्यामुळे या विस्तारात त्यांना मंत्रिपद मिळेल अशी आशा ते बाळगून आहेत.
कोकणातून शिंदे गटातील उदय सामंत, दीपक केसरकर यांना आणि राष्ट्रावादीच्या आदिती तटकरे यांना मंत्रिपद दिले गेले आहे. तसेच भरत गोगावले यांनीदेखील मंत्रिपदाची इच्छा व्यक्त करुन दाखवली पण त्यांना अजूनही मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेले नाही.
आता मात्र या मंत्रिमंडळाच्या विस्तारात भरत गोगावले यांना स्थान मिळणार असल्याची चर्चा आहे. येत्या एक-दोन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामध्ये भरत गोगावलेही मंत्रिपदाची शपथ घेणार आहे, अशी माहिती मिळत आहे.
अजित पवारांनी सत्तेत सहभागी होताना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तसेच त्यांच्यासोबतच्या ८ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाला मिळणारे मंत्रिपदांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याचीही चर्चा आहे.
अशात भरत गोगावले यांनी आदिती तटकरे यांना रायगडाचे पालकमंत्री पद देऊ नये असे जाहीरपणे म्हटले होते. तसेच आपण मंत्रिपदाच्या लाईनमध्ये आहोत, असेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे त्यांना संधी देण्यात येणार आहे.
ठाणे जिल्ह्यातून बालाजी किणीकर, मराठवाड्यातून संजय शिरसाट यांनाही मंत्रिपद देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच अकार्यक्षम मंत्र्यांना वगळण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. त्यामध्ये शिंदे गटातील काही नेत्यांची नावे आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या वरिष्ठांसोबत चर्चा झाली होती. त्यामध्ये अकार्यक्षम मंत्र्यांना काढून त्यांच्या जागी दुसऱ्या नेत्यांना मंत्री करण्यात यावे, अशा सुचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि संदीपान भुमरे आणि भाजपचे अतुल सावे हे अकार्यक्षम मंत्री असल्याचे सांगत त्यांना राजीनामा द्यावा लागणार असल्याचे म्हटले जात आहे.
तसेच अकार्यक्षम मंत्र्यांचे जागी संजय शिरसाट, बालाजी किणीकर आणि भरत गोगावले यांची मंत्रिपदासाठी निवड करण्यात येणार आहे. तसेच मंत्रिमंडळात आता कोणाकोणाला संधी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.