भाजपचा प्लान ठरला! आवळा दिला, आता कोहळा काढणार, लोकसभेत शिंदेंचा गेम करण्याची सगळी तयारी झाली…

सध्या देशात लोकसभेची लगबग सुरू झाली आहे. पक्ष देखील जोरदार तयारी करत आहेत. भाजपने १९५ उमेदवारांचा समावेश असलेली पहिली यादी जाहीर केली. यामुळे आता निवडणुकीला रंग आला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले

भाजपने जाहीर केलेल्या यादीत राज्यातील एकाही जागेचा समावेश नाही. राज्यात सध्या जागावाटप अजून झाले नाही. महायुतीत आणि सत्तेत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मागण्यांमुळे तिढा वाढला आहे.

भाजपने जास्त जागा लढवण्याची तयारी केली आहे. मित्रपक्षांना फारशा जागा देण्याचा भाजपचा विचार नाही. त्याबद्दल शिंदेसेनेच्या नेत्यांनी जाहीरपणे संताप व्यक्त केलेला आहे. यामुळे यावर अजून तोडगा काढला नाही. मात्र सगळ्यांनी तयारी केली आहे.

दरम्यान, रामदास कदम, गजानन किर्तीकर यांना भाजपच्या भूमिकेबद्दल नाराजी बोलून दाखवली. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाचा आवळा दिल्यानंतर आता लोकसभेच्या जागावाटपात कोहळा काढण्याची भाजपची रणनीती आहे.

यामुळे शिंदे आणि अजित पवार यांना लोकसभेत कमीच जागा मिळतील. भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४ जागा सोडण्याच्या तयारीत आहे. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला केवळ ७ जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या निवडणुकीत शिवसेनेने २३ जागा लढवल्या. यामध्ये १८ जागा जिंकल्या. या १८ खासदारांपैकी १३ खासदार शिंदेंसोबत गेले. पण भाजपनं शिंदेंना केवळ ७ जागा देणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे बाकीच्यांनी काय करायचं असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कापला जाऊ शकतो. यामुळे मोठी नाराजी येऊ शकते.