भाजपचं टेन्शन वाढलं! अंतर्गत सर्व्हे आला समोर, विधानसभेतही होणार पानिपत, जाणून घ्या..

सध्या भारतीय जनता पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपचे टेंशम वाढले आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये शंभरी ओलांडत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपची चिंता अंतर्गत सर्वेक्षणामुळे वाढली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपला मोठा फटका बसला होता.

लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही भाजपला मोठं नुकसान होण्याची शक्यता सर्वेमधून पुढे आली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात केवळ ९ जागा मिळाल्या. अनेक हक्काच्या जागेवर त्यांना पराभव स्वीकारावा लागला. भाजपला विधानसभा निवडणुकीत केवळ ५५ ते ६५ जागा मिळू शकतात, असा सर्वेक्षणाचा अंदाज आहे.

यामुळे भाजप नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. २०१४ मध्ये भाजपनं राज्यात १२२ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजप स्वबळावर लढला होता. नंतर २०१९ मध्ये शिवसेनेसोबत युतीत लढलेल्या भाजपनं १०५ जागा मिळाल्या. यामुळे आता नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या अनेक पक्ष फुटले आहेत.

असे असताना भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आता भाजपची सर्व मदार सरकारी योजना आणि मतांच्या ध्रुवीकरणावर आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपने अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र त्याचा परिणाम होणार का याबाबत देखील शंका आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील कामगिरीमुळे भाजप कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम झाला आहे. यामुळे जागा वाटपात नेमकं होणार काय याबाबत देखील शंका आहे. अनेक आमदार देखील शरद पवार गटात जाण्यास उत्सुक आहेत. त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे.

अजित पवारांसोबतच्या हातमिळवणीचा फटका पक्षाला बसल्याचं, त्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाल्याचं अनेक भाजप नेत्यांनी म्हटले आहे. अजित पवारांसोबतच्या युतीचा भाजपला नेमका कसा फटका बसला, यावर प्रदीर्घ लेख लिहिले गेले आहेत.