Delhi : 60 वर्षीय घरमालकिणीचे तरुणासोबत होते अनैतिक संबंध, लग्नाचा विषय काढताच घडलं भयानक

Delhi : दिल्लीतील हर्ष विहारमध्ये बेडबॉक्समध्ये महिलेचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनी महिलेच्या हत्येप्रकरणी तिच्याच भाडेकरुला अटक केली आहे. भाडेकरु आणि महिलेचे अनैतिक संबंध होते.

त्यातूनच त्याने तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. दिल्लीतील 60 वर्षांच्या घरमालकिणीचे तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मयत महिलेचे नाव आशा देवी असं आहे तर, तरुणाचे नाव देवेंद्र उर्फ देव.

देवचे वय 31 आहे. आशादेवी आणि देव यांच्यात शारिरीक संबंध होते. मात्र, त्याचवेळी घरमालकिणीला देवेंद्रचे लग्न ठरल्याबाबत कळले तिने त्याच्यासोबत वाद घातला. दोघांमधील वाद इतका वाढला की त्याने तिची हत्या केली. असा कबुलीजबाब देवेंद्रने दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र आणि त्याच्या घरमालकिणीचे अफेअर होते. मात्र, त्याचवेळी देवेंद्रचे त्याच्याच शेजारी असलेल्या भाडेकरुसोबत लग्न ठरले होते. ही गोष्ट आशादेवीला कळली. त्यानंतर तिने तु दुसऱ्या मुलीसोबत लग्न कसं करु शकतो, यावरुन त्याच्याशी वाद घातला.

त्यांचा वाद विकोपाला गेले. दररोज वाद होत गेल्यानंतर देवेंद्रने तिला मारण्याचा कट रचला. 12 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता देवेंद्र आणि आशादेवी दोघंही तिच्या घरी भेटले होते. तिथे महिलेने त्याला मी जिवंत असेपर्यंत दुसऱ्या मुलीसोबत लग्न करु देणार नाही, अशी धमकी दिली.

देवेंद्रने तिचा विरोध केला. मात्र, महिला त्याचे काहीच ऐकायला तयार नव्हती. तिने त्याला कानशिलातदेखील लगावली असल्याचा दावा आरोपीने केला. यामुळं संतापलेल्या देवेंद्रने जवळच असलेल्या वीटेने तिच्यावर हल्ला केला. तिच्या डोक्यात वीट घालून तिची हत्या केली.

महिलेची हत्या केल्यानंतर देवेंद्रने जवळच्याच दुकानातून 20 मीटर लांब प्लास्टिकची पिशवी खरेदी केली. त्या पिशवीत महिलेचा मृतदेह गुंडाळून ठेवला आणि बेडबॉक्समध्ये टाकला. त्यानंतर महिलेजवळील पैसे आणि दागिने घेऊन तो पसार झाला.

15 डिसेंबर रोजी शेजाऱ्यांना आशादेवीच्या घरातून दुर्गंध यायला लागला. तेव्हा शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन केला. त्यानंतर बेड बॉक्समध्ये महिलेचा मृतदेह सापडला. दरम्यान आरोपी अलिगढ येथे फरार झाला होता. पोलिसांनी अलिगढमधून त्याला ताब्यात घेतले आहे.