भयानक! तरुणीवर मदरश्यात नेऊन अत्याचार अन् नंतर…; नगरमध्ये लव्ह जिहादचे भयंकर प्रकरण समोर

सध्या प्रेम प्रकरणातून अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. त्यातच काही लव्ह जिहादची प्रकरणेही समोर येत आहे. असेच एक प्रकरण आता अहमदनगर जिल्ह्यातून समोर आले ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

कोपरगावमधील खडकीतील एका मदरश्यामध्ये एका मुलीवर अत्याचार करण्यात आले आहे. त्यानंतर तिचा व्हिडीओ बनवून तिला धर्मांतरासाठी ब्लॅकमेल करण्यात आले. तसेच त्या मुलीच्या घरच्यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

व्हिडीओ व्हायरल होण्याच्या भीतीने तरुणी घाबरली होती. त्यानंतर तिचे जबरदस्ती धर्मांतर करण्यात आले आहे. तसेच एका तरुणासोबत तिचे लग्नही लावून देण्यात आले. हे सर्व पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी त्या लोकांवर कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांना ताब्यात घेतले आहे.

सोशल मीडिया वापरण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. सोशल मीडियावर अनेक तरुण तरुणी मित्र बनवत असतात. पण हे किती धोकादायक ठरू शकते हे या प्रकरणातुन समोर आले आहे. ही तरुणी त्या तरुणाला सोशल मीडियावरच भेटली होती. त्या तरुणाने आधी तिच्याशी मैत्री केली आणि नंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

आधी त्या तरुणाने तिच्यावर अत्याचार करून त्याचा व्हिडीओ बनवला. त्यानंतर मुस्लिम धर्म कसा चांगला आहे हे सांगत धर्मांतर करण्यास सांगितले. पण मुलगी हे मान्य करत नसल्यामुळे तिला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि धर्मांतर करून तिच्याशी निकाह केला.

या प्रकरणाबाबत पोलिसांना कळताच त्यांनी तातडीने कारवाई केली आहे. सयाम कुरेशी असे त्या तरुणाचे नाव असून त्याच्यासह चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. श्रीराम संघाच्या कार्यकर्त्यांनी त्या मुलीची सुटका करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती.