ब्रेकिंग! देवेंद्र फडणवीस देणार उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा, राजकीय घडामोडींना वेग….

देशात काल लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. राज्यात देखील मोठं नुकसान झाले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या खराब कामगिरीच्या पार्शभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी दर्शवली आहे. ४ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यामध्ये भाजपचे ९ खासदार निवडणून आले आहेत.

राज्यात काँग्रेसने दमदार पुनरागमन केलं आहे. स्थानिक उमेदवारांवरील नाराजीचा फटका बसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले, आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे, मला सरकारमधून मोकळं करावे अशी विनंती मी नेतृत्त्वाकडे करणार आहे.

तसेच ते म्हणाले, भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेले आहे. मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घातले. जो पराभव झाला त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस स्वीकारत आहे. आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचे आहे.

मला सरकारमधून मोकळ करावे, अशी मी विंनती करणार आहे. बाहेर राहिलो तरी मी काम करीन. पण मला आता पूर्णवेळ विधानसभेकडे लक्ष केंद्रीत करायचं आहे, यामुळे आता नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वरिष्ठ काय निर्णय घेणार हे लवकरच समजेल.

महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. आमच्या आपेक्षापेक्षा खूप कमी जागा मिळाल्या. महाराष्ट्रात आमची लढाई महाविकास आघाडीसोबत होतीच, त्यासोबतच नरेटिव्हसोबत करावी लागली. त्यामध्ये सविंधान बदलणार असा नरेटिव्ह तयार करण्यात आला. हा नरेटिव्ह आम्हाला थांबवता आला नाही.

त्याला आम्ही उत्तर देऊ शकलो नाही, त्याचा आम्हाला फटका बसला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार आणि पक्ष त्यांना कोणती जबाबदारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.