ब्रेकिंग! मनु भाकरने रचला इतिहास! पॅरिस ऑलिम्‍पिकमध्‍ये जिंकले दुसरे कांस्य पदक…

पॅरिस ऑलिम्‍पिकमध्‍ये 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी आज कांस्‍य पदक पटकावले. यामुळे मोठा इतिहास घडला आहे. दोघांनी अचूक लक्ष्‍यभेद करत भारताला नेमबाजीत आणखी एक पदक मिळवून दिले आहे. यामुळे त्यांचे कौतुक केलं जातं आहे.

मनू भाकरचे हे ऑलिम्‍पिकमधील दुसरे पदक ठरले आहे. एकाच ऑलिम्‍पिकमध्‍ये दोन पदके पटकवणारी ती देशातील पहिली खेळाडू ठरली आहे. यामुळे मोठा इतिहास तिच्या नावावर झाला आहे. ऑलिम्‍पिकमध्‍ये 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात प्रत्येकी 10 शॉट्सच्या तीन मालिका असतात.

यामध्ये सर्वाधिक गुण मिळवणारे संघ अंतिम फेरीत प्रवेश करतो. अव्वल दोन संघामध्‍ये सुवर्ण आणि रौप्य पदकांसाठी सामना होतो. तसेच तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे संघ कांस्यपदकासाठी आमने-सामने होते. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग सांघिक पात्रतामध्ये तिसरे स्थानासाठी पात्र ठरले होते.

दरम्यान, कांस्यपदकासाठी त्‍यांचा कोरियन जोडी ली वॉन-हो आणि ओ ये-जिन यांच्याशी सामना झाला. यावेळी दाेघांनी दमदार कामगिरी केली. सलग चार शॉट्‍समध्‍ये दोघांचेही गुण अग्रस्‍थानी राहित ८-४ अशी आघाडी घेतली. यामुळे नेमकं काय होणार याची धाकधूक वाढली होती.

यानंतर पाचव्‍या मालिकेत मनू भाकरने 10.6 गुण घेत निर्णायक आघाडीकडे वाटचाल केली. जाेडीने १४-१० अशी निर्णायक आघाडी घेत कांस्‍य पदकावर आपली माेहर उमटवली. यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

दरम्यान, सलग दुसर्‍या कांस्‍य पदकावरही मनु भाकरने आपली माेहर उमटवली आहे. हे तिचे ऑलिम्‍पिकमधील दुसरे पदक ठरले आहे. एकाच ऑलिम्‍पिकमध्‍ये दोन पदके पटकवणारी ती आपल्या देशातील पहिली खेळाडू ठरली. यामुळे चाहत्यांनी जल्लोष केला.