ब्रेकिंग! पूजा खेडकरला UPSC चा जोरदार दणका! शिकवला आयुष्यभराचा धडा..

गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे अनेक कारनामे समोर आले आहेत. आता त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. युपीएससीने पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांची उमेदवारी रद्द केली आहे. यामुळे ही एक मोठी कारवाई आहे. त्यांना भविष्यातील सर्व परीक्षा निवडींमधून काढून टाकण्यात आले आहे.

याबाबत युपीएससीने दुपारपर्यंत तिला म्हणणं मांडण्यास वेळ दिला होता. पण तिने काहीच प्रतिसाद न दिल्यानं आणि तिचे रेकॉर्ड तपासल्यानंतर पूजा खेडकरवर कारवाई केली आहे. यामुळे अनेकांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. याबाबत कारवाईची मागणी केली जात होती.

पूजा खेडकर यांना ३० जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. तसेच हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र ती आली नाही. त्यांचे उत्तर न मिळाल्याने यूपीएससीने ही कारवाई केली आहे. याबाबत विद्यार्थी देखील आक्रमक झाले होते. आता इतर कारवाई करणे देखील सोप्प जाणार आहे.

पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससीने कारवाई केल्यानंतर आता पोलिस त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. पूजा खेडकरांनी यूपीएससीमध्ये खोटे दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच पुण्यात असताना त्यांनी अनेक कारनामे देखील केले आहेत. त्यांच्या आई वडिलांचे देखील कारनामे समोर आले.

दरम्यान, आता यूपीएससीने पूजा खेडकर यांचे पद काढून घेतले असून त्यांना भविष्यात कोणतीही परीक्षा देण्यात येणार नाही. दिव्यांग प्रमाणपत्र आणि मर्यादेपेक्षा जास्त वेळा युपीएससी परीक्षा देण्यासाठी नावात बदल करण्यात आल्याचे तिच्यावर आरोप होते. यामुळे ही परीक्षा देणारे विद्यार्थी आक्रमक झाले होते.

दरम्यान, आज झालेल्या सुनावणीत सरकारी वकिलांनी पूजाने तिची भूमिका बदलली असून त्यांची कोठडीत चौकशी करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. न्यायालयाने यावर युपीएससीकडे रेकॉर्ड असल्याचे म्हंटले. युपीएससीने पूजाने पूर्ण व्यवस्थेसोबतच फ्रॉड केले असल्याचा खुलासा न्यायालयात केला. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.