ब्रेकिंग! एकनाथ शिंदेंना हटवण्याच्या ठरावावर शिंदे गटातील ‘या’ 23 आमदारांच्या सह्या; उदय सामंत, केसरकर, दादा भुसे अन्…

राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झोप उडणार आहे. सध्या शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी सुरू असून आज दोन सत्रांत सुनावणी पार पाडणार आहे.

यामध्ये पहिल्या सत्रातील सुनावणीत ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची साक्ष घेतली. त्यावेळी ठाकरे गटाकडून धक्कादायक माहिती देण्यात आली. दिलीप लांडेंच्या उलट तपासणीवेळी ठाकरे गटाच्या वकीलांनी एक अटेंडंटशिट सादर केली.

यामुळे याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. ही अटेंडट शीट 21 जून 2022 रोजी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीची होती. यामुळे यावेळी कोण कोण उपस्थित होते याची जोरदार चर्चा रंगली होती. या अटेंडंटशिटवर, शिंदे गटातील तब्बल 23 आमदारांच्या सह्या आहेत.

यावेळी एकनाथ शिंदे यांना गटनेता पदावरून हटवण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला होता, ज्याला या आमदारांनी अनुमोदन दिले होते. यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.

दरम्यान, ठाकरे गटाने शिंदे गटाच्या साक्षीदाराला आज 21 जून 2022 च्या बैठकीची अटेंडन्स शीट दाखवली आहे. ही अटेंडन्ट शीट ठाकरे गटाकडून प्रतिज्ञापत्रात दाखल करण्यात आली होती. यामुळे सर्वांना धक्काच बसला. अटेंडंटस शीटवर अनेकांच्या सह्या आहेत.

यामध्ये शिंदे गटात असलेले गुलाबराव पाटील, संजय राठोड, संतोष बांगर, दादा भुसे, दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, योगेश कदम, उदय सामंत, दीपक केसरकर हे सर्व आमदार उपस्थित होते, असे म्हटले गेले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.