गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. आता या गोळीबार प्रकरणात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या गोळीबार प्रकरणातील एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
अटकेत असलेल्या या आरोपीने आत्महत्या केली. याबाबत पोलीस तपास करत आहेत. त्याने गळफास घेतल्याची माहिती समजताच पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी आरोपीला मृत घोषित केले. यामुळे सगळेच हादरले आहेत.
या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अनुज थापन असे मृत आरोपीचे नाव असून त्याने पोलिस कोठडीतच चादरीने गळफास लावून घेतला होता. त्याची प्रकृती गंभीर होती. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
याबाबत सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या शूटर्सना शस्त्र पुरवल्याचा आरोप अनुजवर होता. सकाळी पोलीस कोठडीची पाहणी करण्यास गेले असता आरोपीने गळफास घेतल्याचे समोर आले. सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चार जणांना अटक केली होती.
पोलीस त्यांच्याकडून तपास करत होते. त्यापैकी दोघांनी सलमानच्या घरावर गोळीबार केला होता. या आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आली होती. तर, या आरोपींना पिस्तुल पुरवल्याप्रकरणी पंजाबमधून सोनू चंदर आणि अनुज थापन या दोघांना अटक करण्यात आली होती.
त्यापैकी अनुज थापन याने आज तुरुंगात चादरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे आता पुढील तपास सुरू असून पोलिसांनी फेकून दिलेले पिस्तुल देखील ताब्यात घेतली आहेत. ती पाण्यात फेकून दिली होती.