---Advertisement---

संभाजीनगर हादरले! सख्ख्या भावानेच केला अल्पवयीन बहिणीवर बलात्कार अन् नंतर…

---Advertisement---

सध्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. एका भावानेच आपल्या बहिणीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे.

भावा-बहिणीचं नातं हे खुप पवित्र नातं मानलं जातं. पण आता सख्ख्या भावानेच बहिणीवर बलात्कार केल्यामुळे संपुर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मुलीची डीएनए चाचणी केली असता त्यातून हे समोर आले आहे.

पोलिसांनी याप्रकरणी पीडितेच्या सख्ख्या भावासह मावस भावावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यांच्यावर बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पण अजून मावस भावाविरुद्ध कोणतेही पुरावे मिळालेले नाही.

मावस भावाविरुद्ध पुरावे मिळाले नसल्यामुळे औरंगाबाद खंडपिठाने त्याला जीमान मंजूर केला आहे. संबंधित घटना ही गंगापुर तालुक्यातील आहे. आधी पीडित मुलीने मावस भावावर आरोप केले होते. पण नंतर जबाबात तिने सख्ख्या भावाने आपल्यावर अत्याचार केल्याचे म्हटले आहे.

पीडितेने दिलेल्या तक्रारीत मावस भावाने ऑक्टोबर २०२२ मध्ये आपल्यावर अत्याचार केल्याचे म्हटले होते. त्यानंतर तिने पुरवणी जबाबामध्ये सख्ख्या भावाने आपल्याशी जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवल्याचे म्हटले आहे.

तिचा भाऊ दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये १० दिवसांसाठी घरी आला होता. त्यावेळी त्याने जबरदस्तीने शारिरीक संबंध बनवले होते, असे तिने म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी डीएनए चाचणी केली असता, त्यामध्ये सख्खा भाऊ दोषी आढळून आला आहे. सख्ख्या भावामुळेच ती गर्भवती झाल्याचे समोर आले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---