Buldhana News: बुलढाण्यातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याठिकाणी मद्यधुंद कारचालकाने दुचाकीसह ३ ते ४ वाहनांना चिरडले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत चारजण गंभीर जखमी झाले आहे.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला बुलढाण्यात मद्यधुंद कारचालकाच्या बेजबाबदारपणामुळे भीषण अपघात झाला. शेगाव-बाळापूर मार्गावर कार चालवत असताना कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि कार समोरून येणाऱ्या दुचाकीसह तीन चार वाहनांना जोरदार धडक दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, शेगाव-बाळापूर मार्गावर रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला आहे. कारमध्ये चार तरुण प्रवास करत असल्याचे सांगितले जात आहे. कारचालक हा दारुच्या नशेत होता. कारचा वेग प्रचंड होता.
कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि कारने समोरून येणाऱ्या दुचाकीसह तीन ते चार वाहनांना चिरडले. इतकच नाही तर कार इतकी वेगाने होती की, वाहनांना धडक दिल्यानंतर कार डिव्हाडरवर चढून रस्त्याच्या कडेला उलटली पडली. सुदैवाने या अपघातात कोणालाही आपला जीव गमवावा लागला नाही.
अपघाताचा आवाज ऐकून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी शेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या अपघातात जखमी झालेल्या चारही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे नववर्षाच्या पूर्वसंध्येला बुलढाण्यात खळबळ उडाली आहे. मद्यधुंद वाहन चालवणे हा एक गंभीर गुन्हा आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याने असे भीषण अपघात होतात. त्यामुळे नागरिकांनी मद्यधुंद वाहन चालवणे टाळावे.