मोदी सरकारच्या योजनांबाबतची वेगवेगळी माहिती नेहमीच समोर येत असते. असे असतानाच आता या योजनांबद्दल एक खळबळ उडवणारी माहिती समोर आली आहे. मोदी सरकारच्या सात योजनांमध्ये मोठा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे.
भारतमाला, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, अयोध्या विकास प्रकल्प, आयुष्मान भारत, पेन्शन योजना, द्वारका महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या सात योजनांमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. या मोठ्या योजनांमध्ये घोटाळा झाल्यामुळे कॅगने मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहे.
एक किलोमीटरच्या रस्त्यासाठी २५१ कोटी रुपये खर्च झाल्याचे समोर आले होते. त्यावरही कॅगने संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे आता भाजप विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे आम आदमी पार्टीने म्हटले आहे.
कॅगच्या अहवालानंतर वेगवेगळे नेते यावर प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. या देशात एकच मोदी विरोधी संस्था आहे ती म्हणजे कॅग. या संस्थेने गेल्या एक दोन दिवसांमध्ये सात घोटाळे उघड केले आहे. त्यामुळे कॅगने मोदींवर तात्काळ ईडीची रेड टाकली पाहिजे, असे सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटले आहे.
आयुष्मान भारत योजनेत साडेसात लाख लोकांनी एकाच नंबरने रजिस्ट्रेशन केले होते. ८८ हजार मृतांच्या नावांनी क्लेम करण्यात आला होता. विकासाच्या प्रकल्पात चुकीच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिले जाताय, असेही सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटले आहे.
तसेच एक रस्ता बवण्यासाठी प्रतिकिलोमीटर १८ कोटींची मंजुरी देण्यात आली आहे. पण नंतर कोणाच्याही मंजूरीशिवाय तोच रस्ता २५१ कोटी रुपये खर्च करुन बनवला गेला. हा किती मोठा घोटाळा आहे, असे आपच्या नेत्या प्रियंका कक्कड यांनी म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतमाला प्रकल्पाचा खर्च १५.३७ कोटी रुपये होता. पण तो ३२ कोटी रुपये दाखवण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या फक्त ५ टोलनाक्यांवर १३२ कोटी रुपयांची तूट असल्याचे आढळून आले आहे.
आयुष्मान भारत योजनेत साडेसात लाख लोकांची एकच नंबरवरुन नोंद केली आहे. आयुष्मान योजनेअंतर्गत उपचारादरम्यान मृत झालेल्या ८८ हजार रुग्णांचे बिल पास केले. जेष्ठ नागरिक, गरीब, विधवा, तसेच अपंगाच्या पेंशनचा निधी स्वच्छ भारत योजनेसाठी पळवला. हिंदुस्तान एरोनॉटिक्स प्रकल्पात चुकीचे इंजिन विकसित केल्यामुळे १५४ कोटींचे नुकसान. तसेच १ किलोमीटर रस्त्यासाठी २५१ कोटींचा खर्च, असे घोटाळे समोर आले आहे.