4 महिने पाण्याखाली बुडालेली कार बाहेर काढली अन् दीर- वहिनीच्या लव्ह स्टोरीचा उलगडा, नेमकं काय घडलं?

मध्य प्रदेशातील मुरैना येथून एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी एका नदीत एक कार सापडली. त्या कारची अवस्था पाहून साधारण चार पाच महिन्यापूर्वी ती नदीत पडली असेल असा अंदाज पोलिसांना आहे. ही कार पाण्यातून बाहेर काढल्यानंतर सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पाण्यातून काढून या कारचे दरवाजे उघडताच एका भयानक दृष्य समोर आले. या कारमध्ये दोन व्यक्तींचे सांगाडे सापडले आहेत. त्यातील एक पुरुष आणि एक महिलेचे आहे. यामुळे नेमकं प्रकरण काय याबाबत तपास केला गेला. घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीम आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले.

गोपी गावात कुवारी नदीत ही घटना घडली. रेस्क्यू टीम आणि जेसीबीच्या मदतीने ती कार नदीबाहेर काढण्यात आली. नंतर पोलिसांनी गावकरांची विचारपूस केली असता. पुरुष सांगाडा दीर आणि महिला सांगाडा वहिनीचा आहे, असे उघड झाले. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात आले.

दोघेही काही महिन्यांपूर्वी घरातून अचानक बेपत्ता झाल्याचही गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितले. ते घरातून पळून गेले असाच समज गावकऱ्यांचा झाला होता. एक दिवस नदीत काम कमी झाले आणि ही घटना उघडकीस आली.

दरम्यान, या दोघांनी आत्महत्या केलीय की कोणी त्यांची हत्या याचा छडा पोलीस लावत आहेत. पोलीस प्रत्येक कोनातून या प्रकरणाचा तपास करत आहेत. लवकरच या मृत्यूचे रहस्य उलगडणार पण भावजय आणि मेहुणीचा लव्ह स्टोरीचा भयावह अंत झाला. यामुळे सगळे आश्चर्यचकित झाले आहेत.

यामुळे सगळेच हादरले असून याबाबत पुढील तपास सुरू आहे. याबाबत पोलिसांनी गावकरी आणि घरातील व्यक्तींकडून तपास केला जात आहे. त्यांचे संबंध आणि इतर तपास पोलीस आता करत आहेत. चौकशीसाठी पोलिसांनी काहींना ताब्यात घेतले आहे.