राज्यात सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अनेक ठिकाणी वातावरण चांगलेच गरम झाले आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आता देशात आज वातावरण कोरडं राहणा असून उद्यापासून पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देशात एकीकडे पाऊस तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. 4 आणि 5 एप्रिलदरम्यान उत्तर कर्नाटकातील वेगवेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे दुपारच्या वेळेत बाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे.
यामध्ये पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये वेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 4 ते 6 एप्रिल दरम्यान झारखंड, तेलंगणा आणि रायलसीमा येथे वेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर गर्मी वाढणार आहे.
आजपासून महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ताशी 30 ते 40 किमी वेगाने तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. यामध्ये पिकांची नासाडी होण्याची शक्यता आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.
सध्या एप्रिल महिन्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर पश्चिम, मध्य भारत, आणि पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पूर्व भारतातील काही भाग आणि उत्तरेकडील भारतातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. एप्रिल ते जून दरम्यान उन्हाळ्याच्या हंगामात पूर्वोत्तर आणि उत्तर भारतातील काही उत्तरेकडील बहुतांश भाग वगळता, देशाच्या बहुतेक भागांमध्ये सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त तापमान दिसून येईल.