Rajasthan : माणूस आहे की राक्षस! ट्रॅक्टरखाली ८ वेळा चिरडलं, वाचवण्याऐवजी लोकं व्हिडीओ बनवत राहीले

Rajasthan : राजस्थानच्या भरतपूरमध्ये वादग्रस्त जमिनीवरून दोन पक्षांमध्ये मारामारी झाली. ज्यात एका व्यक्तीचा ट्रॅक्टरने चिरडून मृत्यू झाला. क्रूरतेची हद्द एवढी होती की त्या व्यक्तीला ट्रॅक्टरने एकदा नव्हे तर आठ वेळा चिरडले.

कुटुंबीयांनी त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला तरी ट्रॅक्टर चालकासमोर ते अपयशी ठरले. तो फक्त त्या व्यक्तीवरून ट्रॅक्टर वेगाने चालवत राहिला. दुसरीकडे काही लोकांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला.

जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जमिनीवरून दोन्ही पक्षांत भांडणे सुरू झाली. या मारामारीत 12 जण जखमीही झाले आहेत. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे प्रकरण बयाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अड्डा गावाचे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील बहादूरसिंग गुर्जर आणि अतारसिंग गुर्जर या दोन कुटुंबांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जमिनीचा वाद सुरू होता. तीन दिवसांपूर्वी दोन्ही पक्षांमध्ये मारामारी झाली होती, याप्रकरणी बायणा पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांनी तक्रार दाखल केली असून, दोन्ही पक्षातील सुमारे 22 जणांना पोलिसांनी अटक केली होती.

मात्र बुधवारी बहादूरसिंग गुर्जर बाजूचे लोक ट्रॅक्टर घेऊन वादग्रस्त जमीन नांगरण्यासाठी गेले. ही बाब दुसऱ्या पक्षाच्या अतारसिंग गुर्जरच्या कुटुंबीयांना कळताच ते आंदोलन करण्यासाठी तेथे पोहोचले. शेतात नांगरणी सुरू असताना दोन्ही पक्षांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

४५ वर्षीय निरपथ सिंग गुर्जर ट्रॅक्टर थांबवून विरोध करण्याचा प्रयत्न करत असताना ट्रॅक्टर चालकाने त्यांना चिरडले, परिणामी त्यांचा मृत्यू झाला. ही लढत पाहण्यासाठी ग्रामस्थांनीही तेथे मोठी गर्दी केली होती. पण ते फक्त प्रेक्षक म्हणून ते दृश्य पाहत राहिले आणि व्हिडिओ बनवत राहिले.

निर्पथसिंग गुर्जरच्या कुटुंबीयांनी मात्र त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रॅक्टर चालक निपथसिंग गुर्जर यांच्यावर वारंवार ट्रॅक्टर इतक्या वेगाने चालवत होता की, कोणी पुढे आले असते तरी त्यालाही चिरडले असते.

ट्रॅक्टर चालकाने श्वास रोखेपर्यंत 8 वेळा वाहन चालवले. माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि सर्व जखमींचे जबाब घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेथे काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. निर्पथ सिंगचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

एएसपी ओमप्रकाश कलवानी यांनी सांगितले की, याप्रकरणी 5 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. काही आरोपी अद्याप फरार आहेत. त्याचा शोध सुरू आहे. आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल.