काल पुण्यात पिंपरी-चिंचवड येथे समोशात कंडोम आणि दगड आढळला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. असे असताना ही घटना ताजी असतांना आता बर्फाच्या लादीत मेलेला उंदीर आढळल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सध्याच्या उकड्यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक जण विविध शीतपेय घेत आहेत. यामुळे मात्र तुम्ही बर्फमिश्रीत पदार्थांना पसंती देत असाल तर तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. अशी ही घटना घडली आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
याठिकाणी बर्फातच मृतावस्थेत उंदीर आढळला आहे. एकाचवेळी मोठ्या प्रमाणात बर्फ तयार केला जातो. हे बर्फ ऊसाचे गुऱ्हाळ, सरबत, गोळा यांसह अनेक शीतपेयांसाठी वापरला जातो. यामुळे आता भीती व्यक्त केली जात आहे. निघोज येथील एका आईस फॅक्टरीमधून हा बर्फ विक्रीसाठी येतो.
हा बर्फ जिथे साठवणूक केली जाते तिथे आल्याला दावा विक्रेत्यांनी केला आहे. उंदीर आढळल्यानंतर बर्फ फेकून देण्यात आला आहे, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मात्र असे प्रकार घडत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, खात असलेला बर्फ दूषित आहे की चांगला हे मात्र सर्वसामान्यांना कळत नाही. कायद्याचे उल्लंघन करून नफा कमवण्यासाठी मानवी आरोग्याला धोका होईल, याचा कोणताही विचार केला जात नाही. यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कोणतीही काळजी न करता बर्फ तयार केला जात असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे कारवाईची मागणी केली जात आहे.