उत्तरेत काँग्रेसचा सुपडा साफ, पण भाजपला दक्षिणेत धक्का, ओपिनियन पोलचा धक्कादायक अंदाज आला समोर..

सध्या काही दिवसांवर आलेल्या लोकसभा निवडणूकीचे आयोगाने लोकसभेचं वेळापत्रक जाहीर केले नाही. असे असताना सी व्होटरने आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात ओपिनियन पोल घेत अंदाज जाहीर केले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यामध्ये सी व्होटर ओपिनियन पोलमध्ये कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात, याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये तामिळनाडूच्या सर्व ३९ जागांवर काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष निवडून येण्याचा अंदाज आहे.

भाजप तामिळनाडूमध्ये आपले खातेही उघडू शकणार नाही. केरळमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. केरळमध्ये अनेक व्हीआयपी निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे अख्ख्या देशाचं लक्ष लागलं आहे. राहुल गांधी वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

येथील एकूण 20 जागांवर केलेल्या सर्वेक्षणानुसार काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष सर्व जागांवर विजय मिळवू शकतात. यामुळे भाजपला दक्षिणेत धक्का बसू शकतो. उत्तरेत मात्र गुजरात, राजस्थानमधून काँग्रेसला एकही जागा मिळणार नसल्याची माहिती आहे.

भाजप इथल्या सर्व २६ जागांवर विजय नोंदवण्याची चिन्हं आहेत. सर्वेक्षणानुसार गुजरातमध्येही राजस्थानप्रमाणेच काँग्रेसचे खाते उघडताना दिसत नाही. राजस्थानमधील लोकसभेच्या सर्व २५ जागा भाजपच्या खात्यात जाऊ शकतात. सर्वेक्षणानुसार राजस्थानात काँग्रेसला खातेही उघडणं मुश्किल जाणार नाही.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडी ४०० पार जागा मिळवेल. तर भारतीय जनता पक्षाला ३७० हून अधिक जागा मिळतील, असा विश्वास पंतप्रधान वेगवेगळ्या सभांतून वर्तवताना दिसतात. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.