गेल्या वर्षभरापासून राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडण्यात आला होता. पण त्यानंतर अजित पवार हे सत्तेत आले आहे. तसेच त्यांच्या मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे म्हटले जात होते. पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार होताना दिसत नाहीये.
लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे वारंवार सत्ताधारी नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. पण मंत्रिमंडळाचा विस्तार काही होत नाही. असे असतानाच आता एक हैराण करणारी माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार काँग्रेसमुळे अडल्याचे समोर आले आहे.
काँग्रेसच्या एका गटामुळे हा मंत्रिमंडळाचा विस्तार अडकला आहे. काँग्रेसचा एक गट भाजपसोबत आल्यानंतर लगेचच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल असे म्हटले जात आहे. ते भाजपसोबत आल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी चर्चा आहे.
नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार यांचा गट सत्तेत सामील झाला आहे. त्यांच्या ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ सुद्धा घेतली आहे. पण त्यांच्या येण्यामुळे शिंदे गटात मात्र नाराजी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी सत्तेत आल्यामुळे शिंदे गटातील आमदारांची काही मंत्रिपदे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिंदे गटातील काही नेते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंत्रिपदाची मागणी करत आहे. पण मंत्रिपदे कमी आणि मंत्रिपदासाठी इच्छुक असणारे नेते जास्त यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार अजून लांबणीवर जात आहे.
असे सर्व सुरु असतानाच काँग्रेसचा एक गट आता भाजपसोबत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना तातडीने दिल्लीला बोलवण्यात आले आहे.या बैठकीत काँग्रेसला सोबत घ्यावे की नाही याबाबत चर्चा होणार आहे.
तसेच काँग्रेसचा एक गट हा सत्तेत आला तर त्यांना काय द्यायचे? असा प्रश्नही भाजप समोर उपस्थित होत आहे. दिल्ली पातळीवरही याबाबत चर्चा सुरु आहे. काँग्रेसच्या या गटात मराठवाड्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातीलही काही नेते आहेत.