Congress party : अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्यानंतर काँग्रेसच्या बैठकीला किती आमदार गैरहजर? धक्कादायक माहिती समोर…

Congress party : काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मोठी खळबळ उडाली. त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. आता अशोक चव्हाण यांच्यामागे नेमकं किती आमदार गेले, याची चर्चा सुरू झाली आहे.

चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे काही आमदार देखील जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसने आपल्या आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. यामध्ये धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

या बैठकीला अनेक आमदार गैरहजर असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे आता काँग्रेसमध्ये देखील भूकंप होणार का? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. याबाबत काही आमदारांना आपण गैरहजर राहण्याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना कळवलं आहे.

काही आमदार नॉट रिचेबल आहेत. यामध्ये काँग्रेसचे ४५ आमदारांपैकी ७ आमदार गैरहजर होते. आता त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये मोहनराव हंबर्डे हे अशोक चव्हाण समर्थक आहेत.

हंबर्डेंच्या घरी लग्नकार्य आहे त्यामुळे ते बैठकील येणार नाहीत, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. यामुळे याबाबत खरी माहिती समोर आली नाही. तसेच माधवराव जवळगेकर हे देखील अशोक चव्हाण समर्थक आहेत. ते देखील हजर नव्हते. जितेश अंतापुरकर हे देखील आले नव्हते.

महत्वाचे म्हणजे अमित देशमुख देशमुख देखील बैठकीला पोहोचले नाहीत. संग्राम थोपटे आणि सुलभा खोडके हे देखील वैयक्तिक कारणामुळे बैठकीला आले नाहीत. अनुपस्थित राहणाऱ्या आमदारांनी न येण्याबाबतची कारणे आम्हाला कळवली आहेत. असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.