गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर या चर्चेत आहेत. आता त्यांना मोठा धक्का बसला आहे. राज्य सरकारने पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण थांबवले आहे. अशातच आता पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे आता अनेक प्रकरणाची माहिती समोर येणार आहे. रायगडमधून त्यांना अटक करण्यात आली आहे. मनोरमा खेडकरचे काही दिवसांपुर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. त्यांनी शेतकऱ्यांना पिस्तुल दाखवून धमकावले होते.
पुणे पोलिसांशी देखील त्यांनी हुज्जत घातली होती. गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकरचा तपास पोलिस करत होते. आज अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकरला महाड मधील हॉटेल मधून अटक केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलिस त्यांना पुण्याला घेऊन येत आहेत.
मनोरमा खेडकर हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती होती. पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. महाड मधून पूजा खेडकरच्या आईला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांचे तीन पथक त्या ठिकाणी शोध घेत होते.
पूजा खेडकरच्या बाणेर येथील बंगल्यावर जाऊन पोलिसांनी मनोरमा खेडकर असल्याची पाहणी केली होती. त्यावेळी तिने पोलिसांना दाद दिली नव्हती. नंतर घराच्या गेटवरती कुलूप लावल्याचं निर्दशनास आलं होतं. फोन देखील बंद असल्याचं समोर आले होते. त्यानंतर पोलिसांची ३ पथकं मनोरमा खेडकरसह इतरांचा शोध घेत होते.
आज अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी मनोरमा खेडकरला अटक केली आहे. पूजा खेडकर यांच्याबाबत देखील रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यांनी आपली पोस्ट मिळवण्यासाठी अनेक बोगस गोष्टी केल्याचे दिसून येत आहे. यामुळे आता त्यांची चौकशी होणार आहे.