कालीचरण महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य! म्हणाले, जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या अन्…

सध्या कालीचरण महाराज यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या, सर्व भोगून घ्या, चांगल्या फुलाचा वास घ्या. नाकाचा सुगंध घ्या. हा सर्व आनंद संपून जाईल. मात्र ईश्वराचा आनंद संपणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. यामुळे यावर संताप व्यक्त होत आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्ताने नाशिकमध्ये कालीचरण महाराजांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. भद्रकाली परिसरातील साक्षी गणेश मंदिर परिसरात कालिचरण महाराजांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.

ते म्हणाले, मी मराठी हिंदी इंग्रजी भाषेत बोलतो. पण माझे शिक्षण झालेले नाही. मी शाळा शिकलेलो नाही, अंगुठा छाप आहे. मला एक पत्रकार भेटले आणि बोलले आपण माणूस म्हणून जगू शकत नाही. ज्यात धर्म नाही तो ढोर आहे.

तसेच खाणे, पिणे, झोपणे हे पशुचे लक्षण आहे. पशू करतो तेच माणूसही करतो. भारत हिंदू राष्ट्र झाले काय? आपले मंदिर फोडले ते पुन्हा झाले पाहिजे का? लव्ह जिहाद बंद झाले पाहिजे का? त्यावर कठोर कायदा झाला पाहिजे का? 88 हजार महर्षी लोक आहे. त्यामध्ये एक माझे गुरू आहे.

त्यांनीच श्रीरामाला धनुष्य दिले होते, असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण आत्मा आहोत, शरीर नाही. जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या, सर्व भोगून घ्या, चांगल्या फुलाचा वास घ्या. नाकाचा सुगंध घ्या. हा सर्व आनंद संपून जाईल. मात्र ईश्वराचा आनंद संपणार नाही, असेही कालीचरण महाराज म्हटले आहे.

दरम्यान, प्रत्येकाचे धर्माची व्याख्या वेगळी आहे. ईश्वराच्या प्राप्तीच सायन्स जीवनात धारण करणे म्हणजे धर्म होय. ईश्वराकडे सर्वाधिक श्रेष्ठ वस्तू मागितली पाहिजे. अनंत सुखानंद म्हणजेच ईश्वर सच्चिदानंद परमात्मा आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.