पेट्रोलचं टेंशनच मिटलं! जुन्या बाईकला बसवा इलेक्ट्रीक किट अन् मिळवा १५१ किमीची रेंज; किंमत फक्त…

सध्या पेट्रोलच्या वाढत्या भावांमुळे सर्वांचे लक्ष इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. अशात मुंबईमधील एक स्टार्टअप चर्चेचा विषय ठरले आहे. मुंबईती ईव्ही स्टार्ट-अप गोगोएवनने एक असे टुलकिट तयार केले आहे, जे एका पेट्रोल बाईकला ईव्ही बाईकमध्ये कन्व्हर्ट करेल.

हे विशेषत: ५० हून अधिक लोकप्रिय दुचाकी मॉडेल्ससाठी डिझाइन केले गेले आहे. ज्यात हिरो होंडा, हिरो मोटोकॉर्प आणि होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया सारख्या ब्रँडचे ४५ हून अधिक मॉडेल्स आणि होंडा ऍक्टीव्हा स्कूटरच्या ५ प्रकारांचा समावेश आहे.

स्टार्ट-अपने टुलकिटची किंमत आणि वैशिष्ट्ये स्पष्ट केलेले नसले तरी, त्यांच्या वेबसाइटवर एक नजर टाकल्यास त्या टुलकीटच्या किंमतींचा अंदाजा येऊ शकतो. त्यानुसार, होंडा ऍक्टीव्हा स्कूटर टुलकिटची किंमत १९ हजार रुपये आहे.

तसेच मोटरसायकलसाठी कन्व्हर्ट किटची किंमत ३० हजार रुपये आहे. तसेच ही किट बसवण्यासाठी एकूण ६०,५०० रुपये खर्च येणार आहे. त्यामध्ये बॅटरी आणि चार्जर यांचाही समावेश आहे. त्यामुळे बाईक पुर्णपणे इलेक्ट्रिक होऊन जाईल.

हे टुलकिट बसवल्यानंतर चार्जिंग फुल असेल तर बाईकला १५१ किलोमीटरची रेंज मिळेल. त्यामुळे हे ग्राहकांसाठी खुप फायद्याचे ठरणार आहे. तसेच या टुलकिटसाठी ग्राहकाला ३ वर्षांची वॉरंटी देण्यात येणार आहे.

या कंपनीचे संस्थापक आणि सीईओ श्रीकांत शिंदे म्हणाले, देशात फक्त इलेक्ट्रिक स्कूटरचे मार्केट तयार करणे हा आमचा उद्देश नाहीये. तर देशातील वातावरण चांगले बनवने, देशात या स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे हे आमचे उद्देश आहे.