Couple Dead : भयंकर! 41 कोटींच्या बंगल्यात सापडला करोडपती जोडप्याचा व मुलीचा मृतदेह, बंगल्यात नेमकं काय घडलं?

Couple Dead : एका जोडप्याचा व त्यांच्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह एका करोडोच्या घरात सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हे कुटुंब एक श्रीमंत कुटूंब होतं. 41 कोटी इतकी किंमत असलेल्या घरांत हे मृतदेह आढळले आहेत. घरगुती हिंसाचारासंबंधीत हे प्रकरण असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

अमेरिकेतील शहरात भारतीय वंशाच्या कुटूंबाबत ही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत माहिती अशी की, गेल्या काही वर्षांपासून हे कुटुंब आर्थिक संकटांचा सामना करत होते. 57 वर्षांचे राकेश कमल आणि त्यांची पत्नी टीना व 18 वर्षांची मुलगी एरियाना यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळले.

तिघांचे मृतदेह आढळलेल्या घराची किंमत जवळपास 41 कोटी इतकी आहे. टीना आणि तिचे पती एडुनोवा नावाच्या एका कंपनीचे मालत होते. सध्या ही कंपनी बंद पडली होती. तेव्हापासून हे कुटुंब आर्थिक संकटांचा सामना करत होते.

गेल्या काही वर्षांपासून हे कुटुंब अर्थिक संकटात सापडले होते. यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. मात्र अधिकृत माहिती समोर आली नाही. ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत सविस्तर चौकशी व तपास करण्यात येत आहे.

दरम्यान, मृतदेहाची वैदयकीय चाचणी झाल्यानंतर त्याचे अहवाल आल्यानंतर याबाबत माहिती समोर येईल. दोन दिवसांपासून या कुटुंबातील कोणताच व्यक्ती फोनचा प्रतिसाद देत नव्हता. घरही आतून बंद होते. यामुळे याबाबत माहिती काढली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर बंद घरात तिघांचे मृतदेह आढळून आले आहे. या प्रकरणी अधिक चौकशी करण्यात येत असून कमल कुटुंबीयांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली? याबाबत पोलीस तपास करत आहेत.