Crime : 13 जणांनी 26 वेळा केला बलात्कार, ती वेदनेने तडफडत राहिली पण राक्षस थांबले नाहीत, हादरवणारी घटना

Crime : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणामधून मनाला सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथे एका अल्पवयीन मुलीवर एक-दोन जणांनी नाही तर 13 जणांनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अल्पवयीन मुलीला नराधम गिधाडासारखे फाडत राहिले. तोंडावर कपडा बांधून ते तिचे लैंगिक शोषण करत होते. मुलीच्या शरीरावर अनेक ठिकाणी चावा घेतला होता. तिच्या प्रायव्हेट पार्ट्समधून आणि शरीराच्या इतर अनेक भागातून रक्तस्त्राव होत होता. तरुणी तिच्या प्रियकराला भेटायला गेली होती. आधी तिच्या प्रियकराने तिचे लैंगिक शोषण केले. प्रियकराच्या मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला.

आपल्या प्रेमाच्या या कृत्याने खजील झालेल्या मुलीला मरावेसे वाटले, पण एका व्यक्तीने मदतीचा हात पुढे करून तिचा विश्वासघात केला. त्याने मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवले. त्या व्यक्तीने मुलीला त्याच्या इतर साथीदारांच्या सनिध्यात नेले. त्यांनीही तिच्यावर बलात्कार केला. दोन दिवसांत 13 जणांनी तिच्यावर 26 वेळा बलात्कार केला.

17 वर्षीय मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. अल्पवयीन मुलीवर तिच्याच प्रियकराने प्रथम बलात्कार केला. सर्व 11 आरोपी फोटोग्राफर आहेत. ही घटना 17 ते 19 डिसेंबर दरम्यान घडली. पोलिसात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर ही बाब उघडकीस आली.

झारखंडमध्ये पोलिसांनी 11 आरोपींना अटक केली आहे. तर इतर दोघांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून 18 डिसेंबर रोजी चौथा शहर पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. 17 वर्षीय तरुणी सरकारी कर्मचाऱ्याच्या घरी मोलकरीण म्हणून काम करत होती. मालक रजेवर गेला होता. ती एकटी होती आणि मालकांच्या पाळीव प्राण्यांची काळजी घेत होती.

पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन तिला विशाखापट्टणम येथे आणले. पीडित मुलगी शॉकमध्ये असल्याने तिला घडलेला प्रकार सांगण्यास थोडा वेळ लागला. पीडितेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी पॉक्सो कायद्यांतर्गत दोन गुन्हे दाखल करून तपास सुरू केला.