Crime news : मंगळवेढा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत. पोटच्या मुलाच्या त्रासाला कंटाळून 72 वर्षीय पित्याने आत्महत्या केली आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलाच्या त्रासाला कंटाळून पित्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळेच हादरले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन शहाजी गायकवाड (वय. 72, रा. मल्लेवाडी)असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा मुलगा राजाराम अर्जुन गायकवाड हा सतत दारूच्या नशेत असायचा. तो दारू पिऊन घरी येऊन वडिलांना व कुटुंबातील व्यक्तींना सतत शिवीगाळ करत असे. या वागण्याला घरातले जवळजवळ सर्वच कंटाळले होते.
इतकच नाही तर राजाराम सतत वडिलांना मारहाणी करत होता. याच त्रासाला कंटाळून अखेर अर्जुन यांनी टोकाचे पाऊल उचलले. 29 जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता मल्लेवाडी येथे दौलत सिंग राजपूत यांच्या शेतातील झाडाला त्यांनी दोरीच्या साह्याने गळफास लावून स्वतःला संपवले.
दरम्यान मयत अर्जुन यांनी खिशात एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ही चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली. चिठ्ठीत लिहिले आहे की, “मुलगा राजाराम हा गेली पंधरा दिवसांपासून प्रचंड त्रास देत आहे. दोन दिवसांपूर्वी माझा गळा दाबून त्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. तसेच जीवे मारण्याची धमकीही देत आहे. त्याच्या धमकीला घाबरून मी आत्महत्या करीत आहे. ”
अर्जुन यांच्या जाण्याने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाबाबत अर्जुनी यांचा मुलगा जयंत अर्जुन गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. भा.द.वि. कलम 306 प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.