Crime News: चिपळूण शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ओझरवाडी येथे राहणाऱ्या दिशा मिलिंद माने हिचा मृतदेह दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्रकिनाऱ्यावर आढळल्याने खळबळ उडाली आहे. दिशा ही इयत्ता बारावीमध्ये शिकणारी चिपळूण येथील डीबीजे कॉलेजची विद्यार्थिनी होती. तिला डॉक्टर व्हायचे होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दिशा सकाळी घरी कॉलेजला जाते म्हणून निघाली होती. मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या पालकांनी चिपळूण शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
दरम्यान, शनिवारी सकाळी कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात पाळंदे समुद्रकिनाऱ्यावर अज्ञात युवतीचा मृतदेह आढळला होता. स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले. पोलिसांनी दिशाचा शोध सुरू केला.
दरम्यान, पाळंदे समुद्रकिनारी एका युवतीचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी दिशाच्या कुटुंबीयांना बोलवले. त्यात चिपळूण पोलिसांना बेपत्ता दिशा माने हिचा मृतदेह असल्याचे आढळून आले. ओळख पटल्यानंतर दिशाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला.
दिशा हिच्या पश्चात्त्य आईवडील, दोन बहिणी असा परिवार आहे. दिशा हिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. मृतदेह दापोली उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दिशा माने हिच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दिशा ही मुळची दापोली तालुक्यातील वाकवली गावची होती. मुलांच्या शिक्षणासाठी दिशाचे कुटुंब चिपळूण येथे वास्तव्यास आहे. पण तिच्या मृत्यूवमुळे माने परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पुढील तपास दापोली तालुक्यातील हर्णै पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक डि.डि.पवार करत आहेत.