Crime News : सासऱ्याचा सुनेवरच डोळा, तसले विडिओ पाठवले रूममध्ये नेलं अन्…: घटनेने उडाली खळबळ

Crime News : बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आपल्या देशात सूनेला मुलगी समान मानणाऱ्या सासऱ्यानेच घृणास्पद प्रकार केला आहे. दरभंगा येथे राहणाऱ्या एका महिलेने पोलिसांत सासऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत पोलिसांनी कारवाई करत अटक केली आहे. सुनेने म्हटले आहे की, माझ्या सासूचे चार वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर सासऱ्यांनी माझ्या पतीला कमावण्यासाठी बाहेर पाठवले. त्यानंतर माझे सासरे आणि नणंद मला वारंवार हुंड्यासाठी छळ करत होते. मला मारहाण करत होते.

तसेच सासरे मला त्यांच्या शरीराला मालिश करण्यास सांगत होते. मी जेव्हा त्यांना मालिश करुन देत असे तेव्हा खोलीचा दरवाजा बंद करुन त्यांनी माझा हात पकडला आणि माझ्यासोबत अश्लील गोष्टी केल्या. मला त्यांच्याशी संबंध बनवण्यास जबरदस्ती करत होते. अनेकदा यासाठी मला त्रास दिला.

ते मला पत्नी बनून राहण्यास सांगत होते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत अटक केली आहे. या प्रकरणी कुटुंबात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आहे.

अशोक पासवान असे या नराधाम सासऱ्याचे नाव आहे. सासऱ्यांच्या रोजच्या त्रासाला वैतागून मी गेले दोन वर्ष माहेरी राहत होते. त्यानंतरही त्याचा त्रास कमी झाला नाही. ते मला रोज मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवत होते, असेही सुनेने म्हटले आहे.

याबाबत पतीला सांगितलं मात्र त्याने देखील काही प्रतिक्रिया दिली नाही. यामुळे मी पोलीस ठाण्यात गेले. या प्रकरणी महिलेचे माहेरचे लोक खूपच संतापले होते. या प्रकरणात आम्ही अधिक चौकशी करत आहोत, असे पोलिसांनी सांगितले आहे.