---Advertisement---

Crime News : बायको अन् लहान चिमुकल्याचा खून का केला? कल्याणमधील खून प्रकरणाचं धक्कादायक कारण आलं समोर…

---Advertisement---

Crime News : दोन दिवसांपूर्वी कल्याणमधील एका उद्योजकाने आपली पत्नी आणि ७ वर्षांच्या मुलाला तोंडावर उशी दाबून ठार मारल्याची घटना समोर आली होती. यामुळे एकच खळबळ उडाली. घटनेनंतर उद्योजक फरार देखील झाला होता. आता याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कल्याण हत्याकांडातील आरोपी व्यावसायिक दीपक गायकवाड याच्यावर ८० कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार होता. त्यामुळे तो त्याच्या पत्नीकडे पैशांची मागणी करायचा. यामुळे वाद होत होता, तसेच पैशांच्या कारणावरुन तो पत्नीला घटस्फोट देणार होता.

शुक्रवारीही त्यांची अशीच भांडण झाली. त्यावेळी पत्नी अश्विनी हीने त्याची कॉलर पकडली. त्याचा राग पती दीपकला आला. त्याने रागाच्याभरात तिची गळा दाबून हत्या केली. यामुळे मोठी खळबळ उडाली. त्याने मुलगा आदिराज याचीही हत्या केली.

असे असताना आता फरार व्यावसायिक दीपक गायकवाड याला महात्मा फुले पोलिसांनी संभाजीनगरमधून अटक केली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. या घटनेनंतर याबाबत त्याने आपल्या कंपनीतील एका कर्मचाऱ्याला याविषयी कळवले होते. तसेच त्याने मी देखील आत्महत्या करणार असल्याचे कर्मचाऱ्याला सांगितले होते.

दीपकने नैराश्याच्या भरात टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे कल्याण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या डोक्यावर मोठे कर्ज असल्याचे सांगितले जात आहे. दीपक हा त्याची पत्नी अश्विनी गायकवाड (वय ३५), मुलगा अधिराज (वय ७) यांच्यासह रामबाग परिसरातील राहत होता.

दरम्यान, दीपक हा उद्योजक होता. तो निधी रिसर्च फायनान्स या कंपनीचा मालक होता. या कंपनीत अनेक कर्मचारी कामाला आहेत. कल्याणमध्ये दीपकच्या मालकीची काही दुकाने आणि एक नर्सरी शाळा होती.

दरम्यान, अश्विनीचा भाऊ विकी मोरे यांनी खुलासा केला आहे की, कशा प्रकारे अश्विनीला पैशांसाठी त्रास दिला होता. अश्विनीकडून पैशांची मागणी केली जात होती. आम्ही दीपक गायकवाडला वेळोवेळी पैसे दिले आहे. काही दिवसांपूर्वी पाच लाख रुपये तिला दिले होते, अशीही माहिती समोर आली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---