Crime news : धक्कादायक! लॉजवर बोलावलं, अभिनेत्रीचे ‘न्यूड व्हिडीओ’ काढले अन्.., घटनेने उडाली खळबळ…

Crime news : चित्रपट सृष्टीत अनेक धक्कादायक अनुभव अनेकांना येतात. ऑडीशनच्या आणि कामाच्या नावाखाली नको ते प्रकार घडत असतात. तसेच शरीर सुखाची मागणी देखील केली जाते. आता असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.

आता सिनेमात काम मिळवून देतो असे सांगून एका अभिनेत्रीचे ऑडीशनच्या नावाखाली अश्लील चित्रिकरण करण्यात आले. मात्र तिची दिशाभूल करून ते अश्लील बेवसिरीज मध्ये प्रसारीत करण्यात आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत तपास सुरू आहे. याप्रकऱणी ३ जणांविरोधात अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखा ३ कडे सोपविण्यात आला आहे. यामुळे ही तरुणी खूप घाबरली होती.

ही अभिनेत्री हिंदी सिनेमा आणि बेवसिरीज मध्ये काम मिळविण्यासाठी ती विविध निर्मिती कंपन्यांकडे (प्रॉडक्शन हाऊस) भेटी देत होती. ही तरूणी १८ वर्षांची असून अभिनेत्री बनण्यासाठी मुंबईत आली आहे. सध्या ती वसईत रहाते.

तिला एका कंपनीतून दूरध्वनी आला होता. आम्ही नवीन बेवसिरीज तयार करत असून त्यासाठी ऑडीशन देण्यासाठी यावे लागेल असे या अभिनेत्रीला सांगण्यात आले. यामुळे तिने देखील होकार दिला. मात्र तिच्यासोबत धक्कादायक घटना घडली.

कामासाठी ही तरूणी विरारच्या अर्नाळा समुद्रकिनार्‍यावर गेली होती. तिथे तिला या प्रॉडक्शन कंपनीचे ४ जण भेटले. त्यात एक दिग्दर्शनक, एक कॅमेरामन, एक अभिनेता तसेच एक महिला मेकअप आर्टीस्ट असे सांगितले गेले.

तिला लॉजवर नेले गेले. यानंतर तिला नको त्या गोष्टी चित्रित करायला सांगितले. मात्र नंतर तिला समजले की याचा वापर दुसऱ्या गोष्टींसाठी केला गेला आहे. तिने चौघांना फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र तिची फसवणूक झाली होती. यामुळे तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.