Crime News : धक्कादायक ! उशीने तोंड दाबून पतीने केली पत्नीची हत्या; वॉशिंग मशीनमुळे आलं सत्य समोर

Crime News : पती पत्नी नातं हे अत्यंत जिव्हाळ्याचं असतं. आपण अनेकदा पाहिला असेल की, पत्नीसाठी पती काहीही करायला तयार असतो. नुकतीच आता पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जबलापूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पतीने आपल्या सरकारी अधिकारी पत्नीची हत्या केली आहे. निशा नपित असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

निशाचा पती मनीष शर्मा यांनी तिची हत्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील दिंडोरी येथील एसडीएम येथे घडला आहे. एका मेट्रिमिनियल साईटच्या माध्यमातून ‌ दोघांची मैत्री झाली होती. काही दिवसांनी मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आणि त्यांनी लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेतला. निशा आणि मनीष 13 ऑक्टोंबर 2020 रोजी विवाह बंधनात अडकले.

लग्नानंतर मनीष पत्नी सोबत राहू लागला. मनीष हा बेरोजगार असल्याचे सांगितले जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनीष पैशांसाठी सातत्याने निशाला त्रास देत होता. याप्रकरणी निशाने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार केली होती. पण हे प्रकरण पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे मिटले होते.काही दिवसांनी पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद सुरू झाली.

काही दिवसांपूर्वी निशाने तिचा 50वा वाढदिवस साजरा केला. पोलिसांनी मनीष ला प्रश्न विचारल्यानंतर त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. या प्रकरणात वॉशिंग मशीनने एसडीएमच्या हत्येचं गुड सोडवण्यास मदत केली. मनीषने पहाटेच्या सुमारास निशाला उशीने दाबून तिची हत्या केली असल्याचे समोर आले आहे . मनीषने पुरावे नष्ट करण्यासाठी पत्नीचे कपडे, उशीचा कव्हर, पलंगावरची चादर हे सगळं वॉशिंग मशीन मध्ये धुवून ठेवले होते. हे पुरावे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर पोलिसांनी मनीषला अटक केली.

पोलिसांनी विचारल्यानंतर मनीष म्हणाला की, निशाचा शनिवारी उपास होता तिने फक्त दोन पेरू खाल्ले होते. त्यामुळे तिला रात्री उलट्या झाल्या आणि ती झोपली. मनी सकाळी मॉर्निंग वॉकला जातानाही निशा झोपलेली होती. ती दुपारी दोन वाजता उठली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. असं सांगून मनीषने पोलिसांची दिशाभूल केली.

निशा मंडला जिल्ह्यात काम करत होती. पोलिसांनी नातेवाईकांची ही कसून चौकशी केली. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा आपल्या पत्नीसोबत सेवा रेकॉर्ड, विमा पॉलिसी आणि बँक खात्यामध्ये नॉमिनी न केल्यामुळे सातत्याने तिच्याशी वाद घालत होता, अशी माहिती दिली.