गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील पोर्शे कार अपघात चर्चेत आहे. या प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहे. या घटनेनंतर देशात खळबळ उडाली आहे. यामध्ये अनेकांना अटक करण्यात आली असून पोलीस चौकशी करत आहेत.
आता या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर आरोप केले आहेत. विशाल अग्रवाल याचा मुलगा लवकर बाहेर यावा, यासाठी मृतांनाच दोषी ठरवणार असल्याची सरकारची तयारी सुरु असल्याचा खळबळजनक आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत ते म्हणाले, मृत तरुण-तरुणीच्या व्हिसेरा रिपोर्टमध्ये फेरफार करुन ते मद्यधुंद अवस्थेत होते, आणि त्यांच्यामुळेच अपघात झाला, असं कोर्टात सिद्ध करण्याची तयारी झाल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.अनिल देशमुख यांनी ‘एक्स’ सोशल मीडिया अकाऊण्टवर दोन ट्वीट करत राजकीय नेत्यांवर आरोप केले आहेत. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारू न प्यायल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले, हे उघड झाले आहे. यामध्ये एका आमदाराचे देखील नाव घेतले जात आहे. याबाबत राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत देशमुख म्हणाले, माजी गृहमंत्री म्हणून माझी माहिती अशी आहे की, मृतकांच्या व्हिसेरा रिपोर्टमध्ये अल्कोहोल पॉझिटिव्ह यावे, याकरिता पूर्णपणे तयारी झाली आहे, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. यामुळे हे प्रकरण आता पुन्हा एकदा याबाबत आमदार रवींद्र धंगेकर आक्रमक होण्याची शक्यता आहे.
देशमुख म्हणाले, या प्रकरणामध्ये मृत झालेले मोटरसायकल वरील तरुण तरुणी हे दारु पिऊन होते आणि त्यांच्यामुळेच हा अपघात झाला, असे न्यायालयात सिद्ध करता येईल. जेणेकरून विशाल अग्रवालचा मुलगा लवकर सुटेल, अशा पद्धतीने प्रयत्न सध्या सुरु आहेत.
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन कारचालक मुलाला आणखी १४ दिवस बाल निरीक्षणगृहात ठेवण्यात येणार असून, या मुलाचे मानसोपचार व व्यसनमुक्तीची समुपदेशन सत्रे अद्याप सुरू आहेत. यामध्ये अनेकांना अटक करण्यात आली आहे.