आषाढी एकादशीसाठी आता अवघे काही तास शिल्लक असतानाच मुंबई, पुण्याहूनही मोठ्या संख्येनं भाविकांनी पंढरपूरला दाखल होत आहेत. असे असताना एक दुःखद बातमी समोर आली आहे. काही भाविकांवर विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेले असतानाच वाटेतच काळाने घाला घातला. यामुळे दुःखाचे सावट आले आहे.
आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवली परिसरातून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या भाविकांच्या बसचा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झाला आहे. रात्री उशिरा हा बस या मार्गावरुन जात असताना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर एका ट्रॅक्टरने बसला धडक दिल्याने अपघात झाला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
बसमध्ये ५४ भाविकांपैकी ५ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर ४० भाविकांवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु असून अन्य जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच याठिकाणी पोलीस दाखल झाले.
बसमधील सर्व प्रवासी डोंबिवली लोढा या परिसरातील होते. भाविक काल रात्री बसने आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला निघाले होते. पण वाटेतच आक्रीत घडले आणि भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी मुकले आहेत. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला बंदी असताना सुद्धा ट्रॅक्टर एक्सप्रेसवेवर आला आणि हा दुर्दैवी अपघात घडला. बंदी असताना सुद्धा ट्रॅक्टर आलाच कसा यावरुन पोलीस यंत्रणेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
दरम्यान, आता पालख्या देखील पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. यामुळे राज्यातून अनेक ठिकाणी वारकरी हे याठिकाणी दाखल झाले आहेत. अशातच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत जखमींवर उपचार सुरु आहेत. पोलीस याबाबत तपास सुरू आहे.