करोनात पतीचं निधन, २ वर्षांनंतरही दु:ख कमी होईना, पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; ८ वर्षांची चिमुकली अनाथ

Woman Ends Life : नागपूर येथील हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील म्हाळगीनगर येथील साई रिजन्सी अपार्टमेंट येथे एक दुःखद घटना घडली. याठिकाणी पतीच्या निधनाने तणावात असलेल्या ३८ वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत माहिती अशी मी, कोरोना काळात कोरोनामुळे अजय यांचे निधन झाले. नंतर पत्नी मुलगी आराध्यासोबत (वय ८) राहायची. सोनाली यांचे वडील राजेंद्र जाधव हे सन्माननगर येथे राहायचे. घरी कोण नसल्याने कामावर जाताना सोनाली या आराध्याला वडिलांकडे ठेवायच्या.

घटनेदिवशी त्यांनी आराध्याला वडिलांकडे सोडले. सायंकाळी आराध्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली. ती राजेंद्र यांच्याकडेच थांबली. मात्र सोनाली या मुलीला घ्यायला घरी आल्या नाहीत. यामुळे वडिलांनी याबाबत तपास सुरू केला.

राजेंद्र यांनी सोनालीला फोन लावला. मात्र फोन लागला नाही. संध्याकाळी राजेंद्र हे सोनाली यांच्या घरी गेले. घर बंद असल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दार तोडले असता सोनाली या रबरी पाइपने पंख्याला गळफास घेतलेल्या दिसल्या, यामुळे त्यांना धक्काच बसला.

दरम्यान, आई-वडिलाच्या मृत्यनेू चिमुकल्या आराध्याचे छत्र हरपले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. यावेळी उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते. बारक्या मुलीकडे बघून अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला होता.