ध्रुव राठीचं नाव रशीद, पत्नी पाकिस्तानी, दाऊदशी संबंध? व्हायरल मेसेजनंतर उडाली खळबळ…

युट्यूबर ध्रुव राठी हा सध्या चर्चेत आहे. त्याच्या व्हिडीओंना लाखो लोक पाहतात. तसेच त्याचे देशात अनेक चाहते आहेत. त्याला विरोध करणारे देखील अनेकजण आहेत. देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. याच पार्श्वभूमीवर ध्रुव राठीने गेल्या काही दिवसांपासून अनेक व्हिडीओ प्रसिद्ध केले आहेत.

यामध्ये त्याने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. निवडणूक रोखे, भारतातील हुकूमशाही हे त्याचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले आहेत. आता त्याच्यासाठी एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे.

यावर ध्रुवने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच माझ्या व्हिडीओला उत्तर नसल्यामुळेच असे मेसेज व्हायरल केले जात असल्याचे त्याने म्हटले. यामुळे एक वेगळाच संदेश यातून जात आहे. ध्रुव राठी हा मुस्लीम असल्याचा एक दावा सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे.

त्याचे खरे नाव बद्रूद्दीन रशीद लाहोरी आणि त्याची पत्नी ज्युली ही पाकिस्तानी असल्याचे म्हटले गेले आहे. ज्युलीचे खरे नाव झुलैखा असून ध्रुव आणि ती दाऊद इब्राहिमच्या कराचीमधील बंगल्यात पाकिस्तानी लष्कराच्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत राहत आहे, असे म्हटले आहे.

माझ्या व्हिडीओंना त्यांच्याकडे उत्तर नसल्यामुळे ते अफवा पसरविण्याचे काम करत आहेत. आता तर त्यांनी हद्दच केली असून माझ्या पत्नीला आणि तिच्या कुटुंबालाही यात खेचले आहे,असे ध्रुव राठीने एक्सवर एक पोस्ट टाकून यावर प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, ध्रुव राठी याचे खरे नाव बद्रूद्दीन रशीद लाहोरी आणि त्याची पत्नी ज्युली ही पाकिस्तानी असल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल केला जात आहे. या मेसेजवर ध्रुव राठीने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.