सावधान! ‘ही’ ५ फळे खाल्ल्यावर चुकूनही पिऊ नका पाणी; पोटात अख्ख ॲसिडच तयार होईल

सध्या काय खावं आणि काय नाही खावं? याबाबत चर्चा होत असते. आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. तसेच चांगले आरोग्य ठेवण्यासाठी चांगला आहारही घेतात.

आहारात वेगवेगळ्या फळांचा वापर लोक करताना दिसून येत असतात. फळं ही आरोग्यासाठी खुप फायदेशीर असतात, असे म्हटले जाते. मिनिरल्स, फायबर, कॅल्शियम आयरनसारख्या गोष्टी फळांमधून मिळत असतात.

फळ खाणे योग्य मानले जात असले तरी काही फळांनी शरीराला नुकसान होते. कारण वेगवेगळ्या फळांचे वेगवेगळे नियम असतात. कोणते फळ कधी आणि किती खावे याचेही एक प्रमाण ठरलेले असते.

अनेकजण दुपारी किंवा रात्रीचे जेवण झाल्यानंतर फळं खातात पण ती पद्धत चुकीची आहे. अनेकजण फळ खाल्ल्यानंतर पाणी पितात तसे करणेही चुकीचे आहे. काही फळे अशी आहेत, जी तुम्ही खाल्ली आणि त्यावर पाणी प्यायले तर ते तुमच्या शरीरावर चुकीचा परिणाम करु शकतात. त्याबद्दलच आता आपण जाणून घेऊया.

१. डाळिंब हे फळ अनेकांना आवडत असते. डाळिंब खाल्ल्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता पुर्ण होते. तसेच हे फळ रोगप्रतिकारक शक्तीही वाढवते. पण ते खाल्ल्यानंतर जर तुम्ही पाणी पिले तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुम्हाला ऍसिडिटी, मळमळ, उलटीही होऊ शकते.

२. केळी- केळी हे उर्जेचे स्त्रोत मानले जाते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोट्याशियम असते. पोटाच्या विकारांसाठी ते खुपच फायद्याचे मानले जाते. पण तुम्ही केळी खाऊन पाणी पिलं तर तुमचे पाचनतंत्र बिघडू शकते.

३. आंबट फळे- संत्रे, द्राक्षे, मोसंबी, आवळा अशी फळे लोक आवडीने खातात. पण त्याच्यावर चुकूनही पाणी पिऊ नका. जर ही तुम्ही फळे खाल्ल्यानंतर पाणी पिलं तर तुमच्या शरीराची पीएच लेव्हल बिघडू शकते.

४. टरबूज- टरबूज किंवा कलिंगड या फळामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते. पण असे असले तरीही काही लोक त्याच्यावर पाणी पितात. त्यामुळे पाचनसंस्था बिघडू शकते आणि जुलाब होऊ शकतात.

५. पेरु- पेरुमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहे. फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फॉलिक ऍसिड पोटॅशियम हे सर्व पेरुमध्ये असते. पेरु खाल्ल्यामुळे पाचनतंत्र सुधारण्यास मदत होते. पण तुम्ही जर पेरुवर पाणी पिलं तर पाचनसंस्था बिघडू शकते.