चालू बसमध्ये ड्रायव्हरला हार्ट अटॅक, मात्र मृत्युआधी वाचवले 65 प्रवाशांचे जीव, घटनेचा थरार ऐकून अंगावर येतील काटे…

धावत्या बसमध्ये ड्रायव्हरलाच हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. पश्चिम बंगालमध्ये ही घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नाही. मात्र चालकाने यावेळी सर्वांना वाचवले आहे.

या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पश्चिम बंगालमधील ही बस बालासोर जिल्ह्यातील निलगिरी भागातील पंचलिंगेश्वरला जात होती. या बसमधून ६५ प्रवासी प्रवास करत होते. मात्र पुढे असे काय होईल, याचा कोणालाही तपास नव्हता.

या बसमधून प्रवास करणारे प्रवासी कोलकत्ता येथील होते. बस चालवताना अचानक चालक एस के आख्तर यांना हृदयविकाराचा झटका आला. यामुळे त्यांना गाडीवर ताबा मिळवणे अवघड झाले. तसेच यावेळी चालकाच्या छातीत तीव्र वेदना सुरु झाल्या.

त्यावेळी ड्रायव्हरने बस रस्त्याच्या बाजूला थांबवली. यानंतर काही वेळातच ड्रायव्हर बेशुद्ध झाला. प्रवाशांनी ड्रायव्हरला जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांना त्याला मृत घोषित केले. मात्र अनेकांचे जीव त्यांनी वाचवले.

मागील आठवड्यातही हरियाणा येथे एका बसचालकाला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी बसचे नियंत्रण सुटले होते. परंतु कंडक्टरने प्रसंगावधान दाखवत स्टेअरिंग हातात घेऊन बस रस्त्याच्या बाजूला उभी केली. यामुळे मोठी घटना होता होता राहिली.

यावेळी चालकाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.अशा प्रकारे घटना घडत असल्याने प्रवासी देखील चिंतेत आहेत. मात्र ड्रायव्हरने कौशल्य पणाला लावून गाडी बाजूला केल्याने अनेकांचे जीव वाचले आहेत. मात्र काहीवेळेस अशा प्रकारे अपघात देखील होत असतात.