आधी तसले Video अपलोड केले अन्…; आता Pornhub ‘त्या’ महिलांना देणार 15 कोटी, नेमकं काय झालं?

Pornhub 15 crore : सध्या मागील 3 वर्षांपासून चर्चेत असलेला खटला निकाला निघाला आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. अडल्ट कंटेट पुरवणाऱ्या पॉर्नहब तसेच अडल्ट कंटेंट बनवणाऱ्या ‘आयलो’ने एक धक्कादायक खुलासा केला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रुकलिन येथील न्यायालयामध्ये आयलो कंपनीने लैंगिक तस्करीमधील पीडितांसंदर्भातील कंटेंटमधून नफा कमवल्याचे म्हटले आहे. यामुळे कंपनीला 1.8 मिलियन डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आयलो होर्टिंग्स एस. ए. आर. एल.’ कंपनीने देहविक्री करण्याच्या उद्देशाने मानवी तस्करीशी संबंधित उद्योगांमधील बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांशी आपला संबंध नसल्याचे म्हटले होते. देहविक्रीच्या व्यवहारामध्ये ढकलण्यात आलेल्या पीडित महिलांच्या संमतीशिवाय त्यांचे व्हिडीओ शूट करण्यात आले. यामुळे याबाबत तक्रारी देखील झाल्या होत्या.

याबाबत व्हिडीओ या वेबसाईट्सवर दाखवण्यात आले. असे असताना आता अशा पीडित महिलांना मात्र कंपनीने नुकसानभरपाई देण्याची तयारी दर्शवली आहे. 15 कोटी रुपयांच्या आसपासची नुकसानभरपाई कंपनी देणार आहे. तसेच कंटेटं स्क्रीनिंग प्रोटोकॉल, बेकायदेशीर कंटेंट रिपोर्ट प्रक्रियेच्या माध्यमातून रिव्ह्यू केला जाईल.

या मोबदल्यात आयलो कंपनीविरोधातील सर्व आरोप 3 वर्षानंतर मागे घेतले जातील. यामुळे आता हे प्रकरण मिटण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान ‘आयलो प्रोडक्शन’च्या मालकीच्या बेवसाईट्सवर मुलींचा उल्लेख असलेल्या काही विशिष्ट विषयांवरील पॉर्न व्हिडीओ अपलोड करण्यात आले होते. 

नंतर आयलो’ कंपनीशी अनेक महिलांनी संपर्क साधून कंपनीच्या मालकीच्या वेबसाईट्ससाठी व्हिडीओ शूट करण्याच्या नावाखाली फसवणण्यात आले. महिलांची ओळख पटेल अशापद्धतीने संमतीशिवाय पॉर्नहब वेबसाईटवर अपलोड करण्यात आले. यामुळे तक्रार दाखल करण्यात आली होती.