शरद पवारांना निवडणूक आयोगाचा पहिला धक्का, नोटीस पाठवली अन्…

राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली आहे. अजित पवारांनी बंड करत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते उपमुख्यमंत्रीही झाले आहे. त्यामुळे शरद पवारांना याचा मोठा धक्का बसला होता. सध्या अजित पवारांकडे जास्त संख्याबळ आहे, त्यामुळे राष्ट्रवादी नक्की कोणाची असा प्रश्न पडला आहे.

२ जुलैला अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यांच्याकडे ४० आमदार असल्याचे त्यांचे नेते म्हणत आहे. त्यामुळे अजित पवारांनी पक्षाध्यक्ष पदावरही दावा ठोकला होता. त्यांनी ३० जुनलाच निवडणूक आयोगाकडे एक याचिका दाखल केली होती.

आपणच पक्षाचे प्रमुख आहोत. त्यामुळे आपल्याकडे पक्षाचं नाव आणि चिन्ह असावं, असे अजित पवारांनी याचिकेत म्हटले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या गटाला एक पत्र पाठवले आहे.

निवडणूक आयोगाने पवारांच्या गटाला एक नोटीस बजावली आहे. त्यामध्ये निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या गटाला आपलं म्हणणं मांडण्यासाठी सांगितले आहे. त्यासाठी त्यांना काही वेळही देण्यात आला आहे. त्यानंतर पक्ष कोणाचा याबाबत निर्णय देण्याची याचिका आगोगाकडे सुरु होणार आहे.

एक वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड केले होते. त्याचप्रमाणे अजित पवारांनीही बंड केले आहे. एकनाथ शिंदे यांचे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने निकाल देत शिंदेंचा गटच खरी शिवसेना असल्याचे सांगत नाव आणि चिन्ह त्यांना दिलं होतं.

आता पुन्हा एकदा तसाच प्रकार घडताना दिसत आहे. पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल झाली असून निवडणूक आयोगाला पक्ष कोणाचा याबाबत निकाल द्यावा लागणार आहे. आता निवडणूक आयोग दोन्ही पक्षांची भुमिका ऐकून घेईल आणि त्यानंतर निर्णय दिला जाणार आहे.या निर्णयासाठी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो.