सगळं अचानक घडलं, फोन आला आणि समजलं बाबा गेले, पैसा असूनही प्रसाद खांडेकरला वाटतेय ‘या’ गोष्टीची खंत..

लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून प्रसाद खांडेकरला ओळखले जाते. महाराष्ट्राची हास्यजत्रामधून त्याने एक वेगळं अस्तित्व दाखवून दिले आहे. स्वबळावर प्रसादने स्वतःच विश्व स्वतः तयार केले आहे. असे असताना त्यांनी एक खंत बोलून दाखवली आहे.

ते म्हणाले, घरच्यांना वेळ देता येत नाही. २०१६-१७ नंतर मी स्वतःच नवं घर घेतलं. आणि श्लोकचा जन्मही २०१६चा आहे. त्यानंतर पासून ‘हास्यजत्रा’ सुरु झालं होतं. माझ्या जीवावर सर्व सुरु होतं मला कुठूनही पाठिंबा नव्हता. पण प्रयत्न कधी बंद केले नाहीत.

तसेच ते म्हणाले, माझं एक वाक्य आहे जे मी प्रत्येक मुलाखतीत सांगतो, जर मला संधी मिळत नसेल तर मी माझ्या माझ्या संधी निर्माण करू लागतो. एक अजून खंत सांगायची म्हणजे, मी १४ वर्षांचा असताना माझे बाबा गेले. त्यांनी मला अनेक चांगल्या सवयी लावल्या.

त्यांनी अनेक चांगल्या सवयी मला लावल्या. माझे बाबा शिवसेना पक्षात शाखाप्रमुख होते. शाखेत गेलो तर कळलं की दुसऱ्या दिवशी शाखेचा भगवा सप्ताह आहे तर ते तिकडे निघून गेले. आणि रात्री अचानक बातमी आली की बाबा गेले आहेत. यामुळे मोठा धक्का बसला.

यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रसिद्धी, पैसा हे सर्वकाही असताना अशी कोणती गोष्ट आहे जी मिस झाली, हे सांगताना त्यांनी त्यांचा जीवनप्रवास उलगडून सांगितला आहे.

दरम्यान, प्रसाद खांडेकर यांनी अभिनय क्षेत्रात अनेक ठिकाणी कामे केली आहेत. नाटक क्षेत्रात त्यांनी सुरुवातीला काम केलं. त्यानंतर त्यांनी कामे वळून बघितले नाही. आता दिग्दर्शक क्षेत्रात देखील त्यांनी पाऊल ठेवले आहे.