सगळे पुरावे बिनकामी ठरले!! दोन जणांचे जीव घेणारा सुटला, पुणे हिट अँड रन प्रकरणी आरोपीला जामीन मंजूर….

गेल्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या पुणे हिट अँड रन प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. पुण्याच्या कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीला आज अखेर जामीन मंजूर झाला आहे. मुंबई हायकोर्टाकडून अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झाला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जामीनानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असून बालसुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. हे प्रकरण राज्यात गाजले होते. मुलाला वाचवण्यासाठी अनेक गोष्टी करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, मुलाची आत्या पूजा जैनने हेबियस कॉर्पसअंतर्गत दाखल केलेली याचिका हायकोर्टाने स्वीकारली आहे. मुलाला आत्याच्या ताब्यात देण्याचे निर्देश जारी केली आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने निर्णय दिला आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

या निकालात अल्पवयीन आरोपीला मोठा दिलासा मिळाल्याचे बघायला मिळत आहे. कल्याणीनगर अपघात घटनेत बाईकवर असलेल्या तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला होता. या दोघांच्या आई-वडिलांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यांना 10 लाखाची मदतीची घोषणा करण्यात आली होती.

तसेच मुख्यमंत्र्यांनी संबंधित घटनेचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आज हायकोर्टाने अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे या तरुणाची बालसुधार गृहातून सुटका होणार आहे.

दरम्यान, या अपघातानंतर मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. यामध्ये अनेक बड्या लोकांनी मदत केल्याचे दिसून आले होते. तसेच काही पोलिसांनी लाखो रुपये घेतल्याचे सांगितले जात आहे. याबाबत डॉक्टरांनाही निलंबित करण्यात आले आहे. यामुळे हे प्रकरण खूपच गाजले होते.