अथर्व सुदामे महिन्याला नक्की किती कमावतो? चाहत्यांच्या प्रश्नावर अखेर त्याने दिले उत्तर, म्हणाला..

सर्व तरुणाईसह सर्व वयोगटांतील लोकांचे मनोरंजन करण्याच्या कसबीने कंटेन्ट क्रिएटर अर्थव सुदामे सर्वांना परिचित आहे. त्याचे व्हिडिओ अनेकजण हसत हसत बघतात. तो एक विनोदी कलाकार आहे. तसेच तो सामाजिक संदेश देतो. यामुळे त्याचे अनेक चाहते आहेत.

सोशल मीडियावरील सर्वात लोकप्रिय पुणेकर अशी ओळख बनवली आहे. त्याला न ओळखणाऱ्यांची संख्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. 10 वर्षांपासून अर्थवने व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. त्याचे इन्स्टाग्रामवर १.४ मिलियन फॉलोअर्स आहेत.

सध्या मराठी सेलिब्रिटी आपल्या चित्रपटांच्या डिजीटल प्रमोशनसाठी अथर्वबरोबर त्याच्या रिलमध्ये दिसून येतात. यामुळे त्याची लोकप्रियता किती असेल याचा अंदाज आपल्याला येईल. कंटेन्ट तयार करणे ही अर्थवची खासियत असली तरी त्याने अभिनयासाठी अभिनयाचे धडेही घेतले आहेत. अनेक बडे लोकं त्याच्यासोबत रिल्स करतात.

असे असताना अर्थव सुदामे किती कमावतो? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एका कार्यक्रमात अथर्वने त्याच्या कमाईबाबत सांगितलं आहे. यावेळी बोलताना अथर्व म्हणाला, माझा जो काही हिशोब आहे तो सर्व माझी बायको, आई-वडील, माझे मित्र हेच बघतात. ते मी बघत नाही.

त्यामुळे मी एक आकडा सांगू शकत नाही. म्हणून मी किती कमावतो असं सांगू शकत नाही. मी फुल टाइम कॉन्टेन्ट क्रिएशन करु शकतो. माझे लग्न झाले आहे. तरी देखील मी हे काम पूर्ण वेळ करु शकतो, असेही त्याने सांगितलं.

तसेच तो म्हणाला की, लग्न झाल्यानंतर जबाबदारी असतानाही मी पूर्ण हे काम करु शकतो इतके पैसे मी कमावतो, असा खुलासा देखील त्याने केला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. याबाबत अनेकांनी त्याला याबाबत प्रश्न विचारले आहेत.