बदलापूरमधील शालेय विद्यार्थीनींच्या अत्याचाराची बातमी अजून ताजीच आहे. या घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत आंदोलन केले जात असून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. अशातच आता आणखी एका घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे.
चंद्रपुरमध्ये ST स्टँडच्या टॉयलेटमध्ये तरुणीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. यामुळे राज्यात नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत कायद्याचा धाक कोणाला राहिला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे 25 वर्षीय मनोरुग्ण मुलीवर बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, नागभीड शहरातील नव्या बस स्टँडच्या निर्जन प्रसाधनगृहात हा प्रकार घडला आहे. 12 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेचा आरोपीच्या मित्रांनीच व्हिडिओ काढला आहे. यामुळे किती विकृती वाईट झाली असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. घटनेनंतर नागभीड शहरातील भाजप कार्यकर्त्यांसह शहरातील शेकडो नागरिकांनी या प्रकाराविरोधात पोलिसात धाव घेतली. यावेळी त्यांनी आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.
सोबतच आरोपीना कठोर शिक्षेची मागणी करत दबाव वाढविला. पोलिसांनी व्हिडीओची तपासणी करून विविध पथके गठीत करत मुलीचा मग काढला. सोबतच घटनेत सामील सर्व 5 आरोपींना 3 तासात ताब्यात घेतले. त्यांची सध्या कसून चौकशी सुरू आहे.
पोलीस अधिक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नागभीड येथे दाखल झाले. या प्रकरणात योग्य चौकशी आणि कठोर कारवाईचे आश्वासन पोलीस अधिक्षकांनी दिले आहे. याबाबत पोलिसांनी कारवाईचे आदेश दिले असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आरोपी कोणीही असला तरी त्याला वाचवू नका असेही त्यांनी सांगितले.