राज्य

बॉलीवूडमध्ये खळबळ! मलायका अरोराच्या वडिलांनी केली आत्महत्या, भयंकर माहिती आली समोर…

बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी आज सकाळी आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अजून कारण समोर आले नाही. सकाळी ९ वाजताच्या सुमारास त्यांनी मुंबईतील वांद्रे इथल्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली आहे.

याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अभिनेता अरबाज खान हा सध्या अरोरा कुटुंबासोबत असल्याची माहिती आहे. याबाबत पोलीस तपास सुरू असून आर्थिक कारणाने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. सध्या अनिल अरोरा यांचे पार्थिव वांद्रे येथील डॉ. भाभा हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे.

हे कुटूंब मुंबईतील वांद्रे येथील अल्मेडा पार्क या इमारतीत राहते. याचठिकाणी सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. अनिल अरोरा यांनी आत्महत्या केली असल्याचे समजताच एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अनेकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली.

याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. अनिल अरोरा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याबाबत अजून आत्महत्येमागील ठोस कारण समोर आले नाही. तपासानंतर याबाबत माहिती समोर येईल.

मागील वर्षी अनिल अरोरा यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते अस्वस्थ असल्याचे देखील सांगितले जात आहे. याबाबत पोलीस सखोल चौकशी करत आहेत. कुटूंबाकडे याबाबत माहिती घेतली जात आहे. घटनेनंतर अनेक बॉलीवूड कलाकार याठिकाणी आले होते.

दरम्यान, अनिल अरोरा हे बाल्कनीजवळ उभे होते आणि ते अचानक खाली पडले. त्यानंतर स्थानिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button