देशाच्या राजकारणात खळबळ! पक्षाने खासदारकीचे तिकीट नाकारले, नेत्याने केली आत्महत्या…

राजकारणातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तामिळनाडूचे खासदार गणेशमूर्ती यांनी पक्षाने तिकीट नाकारल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर सकाळी खासदार गणेशमूर्ती यांनी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

यामुळे तामिळनाडू राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत चर्चा सुरू झाली आहे. खासदार गणेशमूर्ती यांनी रविवारी विष प्राशन केले. ते त्यांच्या राहत्या घरी बेशुद्धावस्थेत आढळले. यामुळे घरच्यांना मोठा धक्का बसला.

गणेशमूर्ती यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. खासदार गणेशमूर्ती यांनी पक्षाने तिकीट नाकारल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याबाबत तपासात अजून माहिती समोर येईल. याबाबत कुटूंबाने माहिती दिली आहे.

घटनेनंतर त्यांना उपचार करण्यासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र आज गुरुवारी सकाळी खासदार गणेशमूर्ती यांनी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे. ते राजकारणात सक्रिय होते.

तामिळनाडू इरोड लोकसभा मतदारारसंघात द्रमुक पक्षाने गणेशमूर्ती यांना तिकीट देण्यात आले नव्हते. त्यामुळे ते नाराज होते. यामुळे त्यांनी विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

खासदार गणेशमूर्ती यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे, की त्यांना तिकीट देण्यास नकार दिल्याने ते गंभीर मानसिक तणावाखाली होते आणि त्यामुळे त्यांनी विष प्राशन केले. खासदार गणेशमूर्ती डीएमके पक्षाचे नेते असून त्यांना निवडणुकीसाठी तिकीट न दिल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला.