दिग्दर्शक निखिल नानगुडे यांनी मराठी इंडस्ट्रीतील काही नावाजलेले दिग्दर्शकांवर आरोप केले आहेत. नवीन दिग्दर्शकाच्या कामात अडथळा निर्माण करणे, स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांशी संबंध तोडणे अशी कामं हे लोकं करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मराठी इंडस्ट्रीतील टॉपच्या दिग्दर्शकांची त्यांनी थेट नावे देखील घेतली आहेत.
यामुळे याची चर्चा सुरू आहे. निखिल नानगुडे हे दिग्दर्शक, लेखक तसेच निर्माता म्हणून मराठी इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. शिवरुद्र निर्मिती या निर्मिती संस्थेतून त्यांनी वलय, मनुष्यगण अशा वेबसिरीज आणि लघुपट बनवले आहेत. अनेकांच्या ते पसंतीस उतरले आहेत. या इंडस्ट्रीत पुढे येण्यासाठी सहकार्य मिळत नाही असा आरोप त्यांनी काही दिग्दर्शकांवर लावला आहे.
ते म्हणाले की, महेश कोठारे, केदार शिंदे, प्रसाद ओक अशी फिल्म इंडस्ट्रीमधील माणसे नवोदितांच्या कामात बाधा आणत आहेत का, अडथळे निर्माण करत आहेत का? नवीन लेखक, दिग्दर्शक वा इतर लोकांसोबत जी नवीन माणसे जोडली जात आहेत त्यांना ही आपल्या स्वार्थासाठी तोडत आहेत का? असेही त्यांनी म्हटले आहे.
तसेच हा एक मोठा प्रश्न, शंका आमच्या बऱ्याच फिल्म मिटींग्स कॅन्सल झाल्याने वा करण्यात आल्याने, वा लांबणीवर गेल्याने उपस्थित होत आहे. हे नक्की! अशी पोस्ट त्यांनी इंस्टाग्रामवर केली आहे. यामुळे आता यावर अनेकांनी प्रतिक्रिया देखील व्यक्त केली आहे.
दरम्यान, महेश कोठारे, केदार शिंदे आणि प्रसाद ओक यांची मराठी इंडस्ट्रीत मक्तेदारी सुरू आहे आणि नवख्या दिग्दर्शकांना ते संधी देत नाहीत. फिल्म मिटींग्स कॅन्सल होणे किंवा त्या लांबणीवर पडण्यामागे यांचा हात आहे का अशी त्यांनी शंका उपस्थित केली आहे.
त्यांनी स्वतः असे अनुभव घेतल्याने हा प्रश्न त्यांनी सोशल मिडियावरच उपस्थित केला आहे. फिल्म मिटींग्स कॅन्सल होणे किंवा त्या लांबणीवर पडण्यामागे यांचा हात आहे का अशी त्यांनी शंका उपस्थित केली आहे.